Atpadi

आटपाडी तालुक्यांमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा !

आटपाडी तालुक्यांमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा !

राहुल खरात

आटपाडी ; प्रतिनिधी/ आटपाडी मध्ये पत्रकार दिन मोठया उत्स्फूर्तपणे साजरा झाला !यावेळी मराठी पत्रकार संघाचे नूतन तालुकाध्यक्ष नंदकुमार निचळ, उपाध्यक्ष लक्ष्मण सरगर व तालुक्यातील सर्व वृत्तपत्राचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते!

यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी सादिक खाटीक यांनी मार्गदर्शन केले व गट विकास अधिकारी मधुकर देशमुख सभापती डॉक्टर भूमिका बेरगळ माजी सभापती हर्ष वर्धन देशमुख उपसभापती रुपेश कुमार पाटील आटपाडी चे पी आय श्री कांबळे साहेब , माणगंगा उपाध्यक्ष भगवानराव मोरे,जि.प.सदस्य मोहन रणदिवे, स्नेहजीत पोतदार, राजेंद्र खरात, उत्तम बालटे उपस्थित होते
गट विकास अधिकारी यांनीही योजनांची ची माहिती दिली पत्रकारांच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचतात त्यामुळे पत्रकारांचे आभार मानतो असे म्हणाले ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांनी आरोग्य विषयी माहिती दिली पत्रकारांना अचानक काही अडचण आल्यास आम्ही सहकार्य करू कसे म्हणाले!

नूतन सभापती डॉक्टर भूमिका बेरगळ म्हणाल्या इथून पुढील काळामध्ये पत्रकाराला येणाऱ्या अडचणी ला आमचे सतत सहकार्य राहील, तसेच झरे चे पत्रकार सदाशिव पुकळे यांचा सत्कार करण्यात आला!. यावेळी सतीश भिंगे अण्णासाहेब भंडारे अशोक पवार प्रशांत देशमुख गणेश जाधव मुजू, तांबोळी लक्ष्मण सरगर बिपिन देशपांडे धीरज प्रक्षाळे, सदानंद कांबळे ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी सादिक खाटीक, तानाजी गायकवाड सुरेश मोकाशी सदानंद कांबळे उपस्थित होते

Leave a Reply

Back to top button