Dhule

? Crime Diary..घरफोडीच्या मुद्देमालासह 04 आरोपी जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखा,धुळे पोलीसांची कामगिरी

घरफोडीच्या मुद्देमालासह 04 आरोपी जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखा, धुळे पोलीसांची कामगिरी

गेल्या काही दिववसांपासून शिरपूर शहर व परिसरात चो-या व घरफोड्या मध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक, धळे यांनी स्था.गु.शा. धुळे चे अधिकारी व कर्मचारी यांना त्यास प्रतिबंध करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सक्त सूचना दिल्या
होत्या.
शिरपूर शहर पो. स्टे. येथे दाखल असलेल्या घरफोडी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखा, धुळे समांतर तपास करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मोहाला, ता. सेंधवा,जि, बडवाणी, मध्यप्रदेश येथील काही लोक धुळे जिल्ह्यातील शेतावर जागले म्हणून काम करत असून त्यांचेकडे त्यांचे काही नातेवाईक पाहुणे म्हणून येतात व पुन्हा जाताना चोरी करून जातात.
त्या अनुषंगाने माहिती घेता मोहाला गावातील जतन मोरे व कुवरसिंह मोरे यांनी त्यांचे साधादाराचे मदतीने शिरपूर तालुक्यातील करवंद, वाघाडी व अर्थे गावात घरफोडी चोरी केल्याची खात्रीशीर खबर मिळाली. त्या अनुषंगाने सदर
संशयिताचा शोध घेता ते पोलीसांची चाहूल लागल्याने मोहाला गावातून पळून जाऊन त्यांची राहण्याची ठिकाणे सतत बदलत होते. त्यामुळे त्यांना पकडणे मोठे अव्हान झाले होते. दरम्यान आज रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
सदरचे आरोपी हे त्यांचे साथीदारासह नरव्हाळ, ता.जि. धुळे येथील एका शेताजवळील तिखी तलावालगत लपून बसले आहेत.
त्यावरून पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून त्यांचा शिताफीने पाठलाग करून (1) जतन रूमसिंग मोरे, वय-21 वर्षे, (2) कुंवरसिंह सुरसिंग मोरे, वय-22 वर्षे, व (3) लालसिंग रेन्या तडवी, वय- 20 वर्षे, सर्व रा. मोहाला, ता. सेंधवा,
जि, बडवाणी , मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे मिळालेली चोरीची मोटारसायकल, चांदीचे दागिने व मोबाईल ईत्यादी मुद्देमाल जप्त करून त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरीतील सोन्याचे दागिने आजच (4) सोनू उर्फ जितेंद्र अशोक सोनार, वय- 30 वर्षे, व्यवसाय- सोनारकाम, रा. घर नं. 44, मेहरूण, ता. जि.जळगाव यास विकल्याचे सांगितल्याने तात्काळ त्याचा शोध घेऊन त्यास पारोळा चौफुली, धुळे येथे पकडून त्याचे कब्जातून चोरीचे विकत घेतलेल्या
सोन्यासह एकूण 4,87,523 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिरपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल भाग 5 गु.र.नं. – 145/2020, 188/2020 व 197/2020 भा.द.वि. कलम 457, 380 प्रमाणे दाखल 03
घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपी जतन रूमसिंग मोरे याने यापूर्वी सन 2018 मध्ये नेर ता. जि. धुळे येथे जैन मंदिरात दागिन्यांची चोरी केल्याची कबुली देऊन तो तेव्हापासून फरार असल्याचे निष्पण्ण झाले आहे. सदर चारही आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपीकडे अधिक विचारपूस करून अधिकचे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. प्रशांत बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. धुळे चे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, पोलीस उप निरीक्षक- हनुमान उगले, पो.हे.कॉ.
संजय पाटील, रफीक पठाण, श्रीकांत पाटील, महेंद्र कापुरे पो.ना. प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पाटील, रविकिरण राठोड, विशाल पाटील, किशोर पाटील, तुषार पारधी, मयुर पाटील, योगेश जगताप, दिपक पाटील
व कैलास महाजन अशांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button