तालुक्यात भारतीय संविधानाची तोंड ओळख पुस्तकाचे वितरण
= औचीत्य- जागतीक पुस्तक दिन
चिमूर -ज्ञानेश्वर जुमनाके
राष्ट्रसेवा दल व छात्र भारती संघटना चिमूरच्या वतीने जागतीक पुस्तक दिनाचे औचीत्य साधुन गुरुवार ला भारतीय संविधानाची तोंड ओळख प्रथम पुस्तक तहसीलदार संजय नागटिळक यांना देवुन तालुक्यातील नागरीकांना वितरण करन्यात आले.
भारतीय संविधानामुळे देशात लोकशाही आहे. संविधानात तिनशे पंचान्नव कलम आहेत. याच कलमाच्या आधारावर देशाची आधारशीला आहे. मात्र संविधानात नेमक काय आहे. संविधान म्हणजे काय याबाबत बऱ्याच नागरीकांना माहीती नाही. आपल्या देशाच भारतीय संविधान प्रत्येक नागरीकांनी वाचले पाहीजे. भारतीय संविधान याचेच संक्षिप्त रूप लेखक पन्नालाल सुराणा लिखीत भारतीय संविधानाची तोंड ओळख पुस्तकाच्या अडीजशे प्रती तालुक्यातील नागरीकांना वितरीत करन्यात आल्या आहे.भारतीय संविधानाची तोंड ओळख पुस्तकात मुलभूत कायदा, राज्यकारभार, संविधानाची पाश्र्वभूमी, स्वतंत्र भारतात राज्य कुनाचे, संविधान परिषद, संकल्पपत्र, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, समाजवादी संविधानाची रूपरेषा, परिशिष्ट, मतदार हा मालक, संघराज्य, पंचायतराज, न्यायालयाची स्वायत्तता, नागरीकांचे हक्क, शासनाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, नागरीकांची मुलभूत कर्तव्ये आदीचा समावेश आहे.
पुस्तक वितरण करताना चिमूर प्रेसचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे राष्ट्र सेवा दलाचे इम्रान कुरेशी, आदी उपस्थीत होते.






