Chimur

मुस्लिमांनी रमजान महिन्यात नमाज़ घरीच अदा करावी: मौलाना तंजील रज़ा यांचे आवाहन

मुस्लिमांनी रमजान महिन्यात नमाज़ घरीच अदा करावी:
मौलाना तंजील रज़ा यांचे आवाहन

तालुका प्रतिनिधी/चिमुर:- ज्ञानेश्वर जुमनाके

मुस्लिमांचा पवित्र महिना रमजान २५ एप्रिल आजपासून प्रारंभ होत आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव पुर्ण एक महिन्याचे निरंक उपवास (रोजा) ठेवतात. या महिन्यात ईशा च्या नमाज च्या वेळेस तरावीहची नमाजचे पठन केल्या जाते व या नमाजला विशेष महत्व असते. कारण की संपुर्ण महिना चालनार्‍या या नमाजमध्ये एका महिन्यात पुर्ण कुराण शरिफचे पठण केल्या जाते. तसेच पवित्र महिना रमजानला इस्लाम मध्ये अनन्य साधारण महत्व असल्याने समस्त मुस्लिम बांधव या रमजान मध्ये एक महिन्याचे उपवास ठेउन अल्लाहची जास्तीत जास्त इबादत करतात.

सध्या भारत देशावर कोरोनाचे संकट उद्भवले आहे. कोरोना हे संसर्गजन्य रोग असल्याने नागरिकांनी जास्त लोकांच्या संपर्कात येऊ नये ही काळाची गरज आहे. तसेच सर्वांच्या सुरक्षे करिता शासन योग्य ते पाऊल उचलत असुन या संकटाला परतवून लावण्यासाठी संपुर्ण नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करने गरजेचे आहे. त्यामुळे लॉक डाऊन मध्ये येणा-या पवित्र महिना रमजान मध्ये मुस्लिम बांधवांनी इफ्तार,तराबीह व ईतर नमाजचे पठण करण्यासाठी घरा बाहेर पडु नये. जसे आत्तापर्यन्त शासनाला सहकार्य करीत घरी नमाज अदा करीत आहात तशीच रमजान मध्येही इफ्तार, तराबिह व ईतर नमाज घरीच अदा करावी असे आवाहन रज़ा सुन्नी मस्जिद चिमुरचे मौलाना मो.तंजील रजा यांनी समस्त मुस्लिम बांधवांना केले आहे. तसेच मुस्लिम बांधवांनी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, सार्वजनीक ठिकाणी जाने टाळावे, बाजारात गर्दी करने टाळावे व कमी गरजे वरती रमजान साजरा करावा असे ही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. तसेच तरावीहची नमाज घरीच वैयक्तीक रित्या ही पठन केल्यास त्याचा तेवढाच सवाब मिळतो व कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा त्यापासून समस्त भारतीयांचे रक्षण व्हावे यासाठी या पवित्र रमजान महिन्यात सर्वांनी प्रार्थना (दुआ) करावी असे ते म्हणाले.

शबे कद्रची नमाजही घरीच अदा करावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ३ मे पर्यन्त लॉक डाऊन वाढविला आहे व भविष्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता लॉक डाऊन पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यात लॉक डाऊन वाढल्यास पवित्र रमजान महिन्यात येणारी मोठी रात्र शबे कद्र ची नमाज ही घरातच अदा करावी असे आवाहन रज़ा सुन्नी मस्जिदचे मौलाना तंजील रज़ा यांनी मुस्लिम बांधवांना यावेळी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button