राजेंद्र निकुंभ यांची विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या “प्रचार व प्रसार प्रमुख” पदी निवड…..
अमळनेर
लोकमान्य विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री राजेंद्र निकुंभ यांची विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान च्या “प्रचार व प्रसार प्रमुख” पदी निवड झाली, या अंतर्गत त्यांना आता ११ जिल्ह्याचे विद्या भारतीच्या प्रचार व प्रसार प्रमुख म्हणून दायित्व मिळाले आहे. परभणी येथे झालेल्या विद्याभारतीचा प्रांत सभेत या जबाबदारीची घोषणा करण्यात आली. देवगिरी व विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री मा. शैलेशजी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर देवगिरी प्रांत मंत्री मा. प्रकाशजी पोद्दार व परभणी जिल्हा अध्यक्ष मा. चलवदे सर उपस्थित होते
यापुर्वी निकुंभ सरांनी जळगाव जिल्हा मंत्री, जळगाव विभाग मंत्री, प्रांत संस्कृती ज्ञान परिक्षा प्रमुख, सांस्कृतिक मंत्रालय कार्यशाळा संयोजक यासारख्या विविध जबाबदाऱ्या भुषविल्या आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.







