युतीचे उमेदवार प्रकाश आबीटकर यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल.
कोल्हापूर-सुभाष भोसले
राधानगरी – भुदरगड- आजरा मतदारसंघातील युतीचे उमेदवार प्रकाश आबीटकर यांनी मंत्री दिवाकर रावते,खासदार सजंय मंडलिक , आमदार सुरेश हाळवणकर,जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थीतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी सपूर्ण परीसर भगवामय झाला होता.
विधानसभा मतदारसंघातील रेंगाळलेला विकास मार्गी लावण्यासाठी मला मिळालेली पाच वर्षे तोकडी पडली आहेत. तरीही पैशासाठी नव्हेतर माणसांसाठी मी माझी सत्ता पणाला लावली म्हणूनच गावंच्या गाव उत्स्फूर्तपणे माझ्यामागे आहेत, हे आज अर्ज भरण्यासाठी आलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या पाठिंब्यावरुन लक्षात येते.असे भावनीक
आवाहन त्यांनी केले.
गरीब जनतेचे प्रेमच मला जिंकून देईल. मतदारसंघातील एकही गाव नाही जिथे विकास पोहोचवला नाही’ जिथे मी काम केलं नाही त्याच शिदोरीवर माझा विजय निश्चित आहे. असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
या रॅलीने 2014 चा उच्चांक मोडला होता.जवळजवळ सात किलोमीटरची मोटरसायकल,गाडयाची रांग लागली होती
यावेळी दत्ताजी उगले,नंदकुमार ढेंगे,बाबा देसाई,के.जी.नांदेकर,बाबा नांदेकर,युवराज सुर्वे,मारूतीराव जाधव, सर्व संरपच ,लाखो नागरीक उपस्थीत होते.






