Amalner

?️अमळनेर कट्टा.. ते आले..त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले..!पाणी फाउंडेशन चे CEO यांची  समृद्ध गाव स्पर्धा निमित्ताने जवखेडे आणि अनोरे गावी भेट..!

?️अमळनेर कट्टा.. ते आले..त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले..!पाणी फाउंडेशन चे CEO यांची समृद्ध गाव स्पर्धा निमित्ताने जवखेडे आणि अनोरे गावी भेट..!

अमळनेर येथील अनोरे या गावाला राष्ट्रीय पातळीवर पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावत संपुर्ण तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले.पाणी फाउंडेशन आयोजित ह्या स्पर्धे नंतर सत्यमेव जयते ने नवा वसा घेत समृद्ध गाव स्पर्धेचे आयोजन केले आहे.ह्याच स्पर्धेची माहिती देण्यासाठी तसेच अनोरे गावाला पारितोषिक प्राप्त झाल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी पाणी फाउंडेशन चे CEO ,सत्यमेव जयते मालिकेचे दिग्दर्शक श्री सत्यजित भटकळ यांनी आज तालुक्यातील जवखेडे, अनोरे,दहिवद या गावांना भेट दिली.

याप्रसंगी जवखेडे आणि अनोरे गावात ग्राम सभा घेण्यातआल्या.आनंद,पाणी,आत्मविश्वासाचा ठेवा पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून गावांनी मिळवला आहे.गावाचा एकोपा असल्यास पैसा वाचून विकास अडत नाही म्हणून अनोरे गांवाच नांव भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल!असा विश्वास अनोरे येथील सभेस संबोधित करतांना सुप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक तथा पाणी फाउंडेशन चे सी ई ओ सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केला.

‘गावांच्या भविष्याच्या दृष्टीने पहिला टप्पा पाणी होता तो आपण गाठला आहे. पाण्यातून आता निसर्गाची आणि गावाची समृद्धी साधायची आहे! वॉटर कप स्पर्धेनंतर आता सत्यमेव जयते समृद्ध ग्राम स्पर्धा असेल जी दिड वर्ष चालणार आहे.कष्ट,जिद्द,ज्ञान या बळावर ग्रामस्थ स्पर्धेत नक्कीच यश मिळवतील!असेही सत्यजित भटकळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मंचावर अमळनेर प स चे गटविकास अधिकारी एस बी सोनवणे,सानेगुरुजी फाउंडेशन चे नरेंद्र पाटिल, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, पत्रकार आणि आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे ,नितीन चव्हाण,आशिष चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात जलदुत मा.जि प सदस्य संदिप पाटिल यांनी अनोरे गावकऱ्यांनी एकजुटीने केलेल्या भरीव कामांचे स्वरूप विषद केले.पाणी फाउंडेशन चे उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी सांगितले की गावकऱ्यांनी केलेलं काम बोलकं आहे. गावांत संवाद वाढवत नेऊन पुढे जायचं आहे!

याप्रसंगी गावातील कु.हर्षदा पाटिल, सौ.सुनिता पाटिल,नवनीत पाटिल, हिम्मतराव पाटिल यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की ‘ कधीकाळी बाहेरगावी रोजगारासाठी जाणारे ग्रामस्थ पाणी फाउंडेशन च्या यशस्वी कामांमुळे आता गावाकडे परतले आहेत.
अनोरे गावाला भेट देत सुप्रसिद्ध दिग्दर्शक तथा पाणी फाउंडेशन चे सी ई ओ सत्यजित भटकळ यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेती,शेततळे,विकास कामे आदिंची पाहणी केली.

गावाच्या वेशीवरून सत्यजित भटकळ यांना सजवलेल्या बैलगाडी वर बसवून सवाद्य मिरवणूकीने गावात आणले गेले. यावेळी संपूर्ण गावातील स्त्री पुरुष तरुण युवक युवती बाल गोपाळ मंडळी मोठ्या उत्साहाने स्वागतासाठी उपस्थित होते.

पाणी फाउंडेशन च्या यशस्वी कामानंतर पिकविलेल्या भाजीपाल्याचा कंडा तरुण शेतकऱ्यांनी सत्यजित भटकळ यांना देऊन त्यांचा सत्कार केला तर युवा कार्यकर्ते खुशाल पाटिल ,विजय पाटिल यांनी शिवप्रतिमा भेट दिली. भटकळ यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
कार्यक्रमास समन्वयक भूषण ठाकरे,सुनिल पाटिल,ग्रामसेवक शशिकांत पाटिल,लोटन पाटिल उपस्थित होते.याप्रसंगी आशिष चौधरी, ग्रा प सदस्य नरेंद्र पाटिल,सदस्या उषाबाई पाटिल, पुष्पलता पाटिल ,योगराज पाटिल,अंबुनाना पाटिल,शेणपडू पाटिल शांताराम पाटील भगवान पाटील विठ्ठल पाटील वसंत पाटील निलेश पा अशोक पा उदय पा. आदिसह महिला भगिनी तरुण तरुणी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button