?️अमळनेर कट्टा..Big Breaking..मांडळ,ता अमळनेर येथे महसूल पथकाची दबंग कार्यवाही..ताब्यात घेतले अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर..
अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असून वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाळू माफियांच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेत अमळनेर महसूल विभाग सातत्याने कार्यवाही अमळनेर चे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी करत आहेत.
आज 7.00 वाजेच्या सुमारास मौजे मांडळ येथुन अवैधरित्या वाळु वाहतूक करणारे वाळु भरलेले ट्रॅकटर आर्डी ढेकू गावाजवळ पकडण्यात आले. हे राहुल पाटील उर्फ रिंकू रा पिंपळे बु येथील रहिवासी असून हा वाळू चोर सराईत आहे.या पूर्वी ह्या वाळू चोराने तहसील कार्यालयातुन ट्रॅकटर पळवून नेले होते. त्यावेळी संबधित व्यक्ती वर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
सदर पथकात जी.आर .महाजन शहर तलाठी, जितेंद्र जोगी तलाठी सडावन बु., आशिष पारधे तलाठी मांडळ, वाय आर पाटील तलाठी पातोंडा, प्रथमेश पिंगळे तलाठी नगाव बु., स्वप्नील कुळकर्णी तलाठी जुनोने, सचिन बमनाथ तलाठी बाम्हने व महेश अहीरराव तलाठी टाकरखेडे हे होते. सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह पोलीस स्टेशन अमळनेर येथे जमा केले.






