Chimur

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग….पबजी आनलाईन गेमच्या आहारी गेलेली तरुण पीढ़ी मनोरुग्ण अवस्थेच्या स्टेजवर!

पबजी आनलाईन गेमच्या आहारी गेलेली तरुण पीढ़ी मनोरुग्ण अवस्थेच्या स्टेजवर!

चिमूर/ प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने खबरदारी घेतली असतांना शाळा, महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी युवक घरीच आहेत. अनेक तरुणांना आनलाईन पबजी गेमचे वेड लागले आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाईचा मोठा भाग गुरफटत जात असल्याचे एकूण चित्र असून,पबजी गेम च्या विळख्यात सापडून आतापर्यंत अनेक विद्यार्थी आणि तरुणांनी आत्महत्या करण्या पर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

विद्यार्थी आणि अनेक तरुण पबजी गेम खेळून मनोरुग्ण अवस्थेच्या टप्प्यावर तर पोहचणार नाही?असे चित्र सद्या चिमूर तालुक्यात बघायला मिळत आहे.पबजीच्या गेमच्या आहारी गेलेल्या त्या तरूणांनी स्वत:चे भानही हरवलयाचे एकूणच चित्र आहे.गेम खेळतांना मोठया मोठ्याने अश्लील शिवीगाळ करणे,

पबजी गेम मधील पात्रात स्वतःला समरस करून आपन प्रत्यक्षात ती कृती करतो आहोत,या भ्रमात आणि आभासी विश्वात रमून स्वत:ला सैनिक ठरवत बंदूकीने गोळ्या झाडणे लपणे, भिंतींना जाऊन धडकण्याचे हावभाव करणे,मोठमोठ्याने ओरडणे,अश्लील शिवीगाळ करणे, सध्या चिमूर तालुक्यात बघायला मिळत असून, हे तरुण रात्रीच्या अंधारात आपल्या घरासमोरील चौकात, तर कधी एकांतात हा पबजी गेम खेळत असतांना असले प्रकार घडत आहेत.
रस्त्यानी ये-जा करणाऱ्या लोकांचे भानही या तरुणांना राहत नसल्याने पबजी गेम च्या विळख्यात ग्रामीण युवकही सापडले असल्याचे प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे.याचा थेट परिणाम तरुणांच्या दैनंदिन आयुष्यावर होताना दिसत असून पबजी’ या गेम मुळे पालक – तरुण यांच्यात संघर्ष वाढू लागला आहे.

प्रत्येक आनलाईन पबजी खेळणाऱ्याचे वेळीच नियोजन केले नाही तर भविष्य काळात हा गेम खेळणाऱ्या प्रत्येक युवकावर त्याचे मनोवैज्ञानिक गंभीर परिणाम दिसून येतील,असे जाणकारांचे मत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button