महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना एरंडोल /पारोळा तर्फे सत्काराचे आमंत्रण..!
विक्की खोकरे
एरंडोल – कोकण भवन बेलापूर येथे आज दिनांक २४/०१/२०२० रोजी महाराष्ट्राचे महसूस मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांना एरंडोल व पारोळा तालुका काँग्रेसच्या वतीने नागरी सत्काराचे निमंत्रण देण्यात आले. सदर निमंत्रण माननीय मंत्री महोदयांनी स्वीकारले असून लवकरच तारीख कळवतो असे सांगितले आहे. निवेदन देतांना यावेळी माजी आमदार माननीय हरिभाऊ महाजन, एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय आण्णा महाजन, पारोळा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब पिरनकुमार अनुष्ठान, सावतामाळी शिक्षण प्रसार मंडळाचे उपाध्यक्ष श्री दिनेश माळी व सचिव सुकलाल आण्णा महाजन धरणगाव हे उपस्थित होते.






