एक वर्षांनंतर पकडले चार आरोपी ,चिमूर पोलिसांची कारवाई
चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर पोलीस स्टेशन मध्ये दि 4 नोव्हेबर 2018 ला गुन्हा दाखल करण्यात आल्यावर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक केल्यानंतर उर्वरित आरोपी फरार होते मुख्य आरोपी अनुप पवार जेल मध्ये एक वर्षापासून असताना इतर आरोपी फरार झाले तेव्हा तपास पथक ने अखेर त्या चार आरोपींना अटक केली .
सविस्तर हकीकत असे की चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका ह्या चिमूर मध्ये राहत असताना तिचा पती अनुप पवार व इतरांनी यवतमाळ जिल्ह्यात तलाठी ग्रामसेवक ,चपराशी पदावर नौकरी लावून देतो अशी आमिष देऊन सुशीक्षीत बेरोजगाराकडून लाखो रुपये घेतले असून यात 36 लाख रुपये उखडून फ्रॉड काम केले .नौकरी लावून देण्यासाठी त्यांच्या टोळीतील काहींना सीओ चा वरीष्ठ लिपिक ,विस्तार अधिकारी असल्याचे सांगून फ्रॉड केले आरोपीतील एक आरोपी तर चक्क वर्ग 2 वी शिक्षण घेतलेल्या ला वरिष्ठ लिपिक सांगितले .वर्षभर वाट पाहून नौकरी लागत नसल्याने आपली फसगत झाल्याचे कळल्यावर अखेर रमेश भोयर यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला तक्रार केली तक्रारीवरून मुख्य आरोपी अनुप पवार यास अटक करण्यात आल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास जेल रवानगी झाली तेव्हा इतर आरोपी फरार झाले तपास पथक शोध घेत असल्याने ते घरी राहत नव्हते तपासाचा वेग कमी झाल्याने त्या आरोपींना आता पोलीस येणार नसल्याने ते गावात घरीच राहत होते .अखेर तपास पथक सपोनि मंगेश मोहोड यांनी तपास हाती घेऊन तपास पथकाच्या साहाय्याने आरोपींना त्यांच्या घरून अटक केली .
चिमूर पोलीस स्टेशन ला दि 4 नोव्हेंबर 2018 ला अप क्र 562 /18 कलम 420,468,471 ,34 भादवी गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यातील मुख्य आरोपीस अटक करून गुन्हा नोंदविला असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली त्यातील इतर आरोपी फरार झाले तपास पथकाने तपास चक्र फिरवीत एक वर्षानंतर त्या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात यश आले आरोपी यवतमाळ जिल्ह्यातील असून त्यातील पद्माकर नामदेव घायवान रा पाटीपुरा यवतमाळ ,प्रदीप सहदेव मेश्राम रा लालखेड ता दारव्हा, किसन लक्ष्मण निकम रा येळबोरा , चंद्रमनी नामदेव कवाडे रा येळबोरा हे आरोपी असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ रेड्डी ,अप्पर पोलीस अधीक्षक खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती इंगवले पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सपोनि मंगेश मोहोड नापोशी किशोर बोढे, पोशी प्रमोद गुट्टे, पोशी रवी आठवले यांनी कारवाई करीत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे .






