Amalner

पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी दोन मुलांचा मृत्यू…. मृतदेह शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील….पोलीस निरीक्षक मोरेंनी स्वतः पाण्यात मारली उडी…

पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी दोन मुलांचा मृत्यू…. मृतदेह शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील….पोलीस निरीक्षक मोरेंनी स्वतः पाण्यात मारली उडी…

पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी दोन मुलांचा मृत्यू.... मृतदेह शोधण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील....पोलीस निरीक्षक मोरेंनी स्वतः पाण्यात मारली उडी...

अमळनेर ;- अमळनेरला बोरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ ते दहा मुलांपैकी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला.एकाचा मृतदेह सापडला तर दुसरा बेपत्ता त्याचा मृतदेह बोरी नदीत शोधण्यासाठी अमळनेरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यासह नागरिकांनी कंबर कसली.
अमळनेरला सध्या तामसवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीमध्ये पाण्याचा चांगला साठा झाला असून त्यात अनेक मुले सध्या पोहण्यासाठी येताना दिसत आहे .आज दिनांक १७ मंगळवारी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास नऊ ते दहा मुले पोहण्यासाठी बोरी नदीत हिंगोणे शिवारात गेले होते, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांच्यातील दोन मुले पाण्यात बुडाले, सदर घटना सोबतच्या मुलांनी पाहताच बाहेर पळाले व नागरिकांना कळवल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांची टीम घटना स्थळी पोहचले, यावेळी दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक मोरे यांनी स्वतः कपडे काढून पाण्यात उडी घेतली त्यांच्या सह नागरिकांनी सुध्दा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यांच्यातील एक मृतदेह सापडला असून तो मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
तरी एक मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हे दोन्ही मुले कसाली मोहल्ला भागातील आहेत.दानिश शे अरमान (१६) याला बाहेर काढण्यात यश मिळाले तर शाहिद खा रहेमान खा (१५) राहणार कसाली मोहल्ला अजूनही पाण्यात आहे.नगरपालिका व महसूल प्रशासन, पोलीस कर्मचारी व पोहणारे तरुण त्याचा शोध घेत आहे.
या घटनेमुळे शहरात नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. बोरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, एकाचा मृतदेह सापडला तर दुसरा मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button