Pandharpur

? वाळूचोरीमुळे वाळवंटातील प्रसिद्ध मंदिरेच आली धोक्यात

वाळूचोरीमुळे वाळवंटातील प्रसिद्ध मंदिरेच आली धोक्यात

विक्रम शिरसट यांचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न सुरू

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरासह तालुक्यातील वाळू चोरीचे प्रमाण सध्या भरमसाठ वाढले आहे.महसूल व पोलीस प्रशासनातील काही लोकांच्या मदतीने चंद्रभागेच्या पात्रातून दिवसरात्र वाळू उपसा सूरु आहे.मात्र आजवर दूरवरून होडीतून वाळू आणून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या चंद्रभागेच्या वाळवंटाला पोखरायला सुरुवात केल्याने पंढरीतील चंद्रभागेच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.या खड्ड्यांमुळे वाळवंटात असणारे प्रसिध्द भक्त पुंडलिक व अन्य लहान मंदिरांना धोका निर्माण झाला आहे.

नदीची पाणीपातळी वाढल्यास वाळूचोरी करताना पडलेल्या खड्ड्यांमुळे ही मंदिरे उकरून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ही भीती ओळखून पंढरपूरचे नगरसेवक व बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांनी नगरपरिषदेच्या मदतीच्या साहाय्याने हे खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेत हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत पंढरीतील नदीकाठ आणि वाळूचोरी हा नेहमीचा चर्चेचा विषय.डोळ्यादेखत वाळूचोरी सुरू असतानाही पध्दतशीर डोळेझाक करणारे प्रशासन.मात्र आता ह्या वाळूचोरीच्या अतिरेकामुळे पंढरीची ओळख असणाऱ्या अनेक ऐतिहासिक मंदिरांना धोका निर्माण झाला असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही कडक उपाययोजना केल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मात्र हा संभाव्य धोका ओळखून नगरसेवक विक्रम शिरसट यांनी खड्डे बुजविण्याची व मंदिरे वाचविण्यासाठी सुरू केलेली मोहीम सर्वत्र चर्चेत असून सर्व स्तरातील लोकांकडून याचे कौतुक केले जात आहे.यासाठी त्यांना नगरपरिषदेसोबतच सतीश नेहतराव, मारुती संगीतराव,प्रकाश बुवा अभंगराव,सोनू आधटराव,महादेव अभंगराव,माउली आधटराव,आनंद माने यांच्यासह होडी माल चालक मालक संघटना व कोळी समाजातील युवकांचा पाठिंबा व सहकार्य मिळत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button