न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बाचणीच्या विद्यार्थ्यानी दिली प्राचार्याना वाढदिवसाची अनोखी भेट
सुभाष भोसले-कोल्हापूर
न्यू हायस्कूल व ज्युनि कॉलेज बाचणीचे
प्राचार्य अनिल रघुनाथ खामकर यांचा वाढदिवस याच दिवशी कागल येथे झालेल्या जिल्हास्तरीय शासकिय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आपल्या ज्ञान – दीप शिक्षण संस्था संचलित न्यू हायस्कूल व ज्युनि कॉलेज बाचणीच्या 17 वर्षाखालील गटामध्ये मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक तर 14 वर्षाखालील गटामध्ये मुलांच्या संघाने व्दितीय क्रमांक मिळवून प्राचार्याना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
या संघाना संस्था उपाध्यक्ष व आंतरराट्रीय प्रशिक्षक अजित पाटील , क्रीडा शिक्षक ए. पी पाटील , एस्. एस् सडोलकर, एम् एस कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्थापक सचिव एम् एस्. पाटील , प्राचार्य अनिल रघुनाथ खामकर , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रोत्साहान लाभले.या यशस्वी विदयार्थी व संस्थेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे






