न्यू हायस्कूलमध्ये श्री लक्ष्मण सडोलकर यांचा सत्कार
सुभाष भोसले-कोल्हापूर
ज्ञान – दीप शिक्षण संस्था संचलित न्यू हायस्कूल व ज्युनि कॉलेज बाचणी येथे लक्ष्मण कुंडलित सडोलकर यांना आँनररी लेफ्टनंट पदावरती बढती मिळालेबद्दल त्यांचा न्यू हायस्कूल परिवाराच्या वतीने संस्था संचालक सदाशिव आप्पाजी पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सडोलकर म्हणांले की विद्यार्थ्यानी आताच ध्येय निश्चित करून ते पूर्ण करणेसाठी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. सैन्यदलामध्ये भरती होवून देश सेवा करा असे त्यानी विद्यार्थ्याना आवाहन केले.
यावेळी संस्थापक सचिव एम् एस् पाटील, संस्थासंचालक सदाशिव पाटील, प्राचार्य श्री अनिल रघुनाथ खामकर सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसचलन व्ही. आर. सडोलकर तर आभार श्री जे. एस् पाटील यानी मानले.






