अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे स्काउट शिक्षक एच ओ. माळी होते तर विचारपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के एस के महाजन हिंदी शिक्षक आय आर महाजन होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त शाळेत वकृत्व स्पर्धा घेण्यात आली . शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वकृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले.
वकृत्व स्पर्धेत प्रथम खुशी वसंत डांगे (इयत्ता दहावी) द्वितीय हर्षाली माधवराव महाजन (इयत्ता दहावी) तृतीय
नेहा सुरेश पाटील (इयत्ता नववी) उत्तेजनार्थ नंदिनी वसंत डांगे (इयत्ता नववी),अश्विनी आधार महाजन(इयत्ता नववी) यांनी वकृत्व स्पर्धेत हिंदी राष्ट्रभाषा चे महत्व या विषयावर उत्कृष्ट भाषण केले त्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे दिली जाणार आहेत.
शाळेचे हिंदी शिक्षक आय.आर.महाजन
यांनी हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट करतांना सांगितले कि शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून स्काउट शिक्षक एच.ओ. माळी म्हणाले की हिंदी राष्ट्रभाषा चे महत्व अनन्यसाधारण आहे हिंदी हि संपर्काची भाषा असून तिला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळत नाही ही शोकांतिका आहे. आपण देशातल्या कोणत्याही राज्यात गेलो तर हिंदी ही सर्रास बोलली जाते . भाषा हे भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक भाषेचा सन्मान करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. प्रत्येक कार्यालयांमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही तोपर्यंत हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळू शकत नाही त्यासाठी मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक एस के महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.








