जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालका व व्यवस्थापकसह पाच जणांवर फसवणूक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
बोदवड प्रतिनिधी सुरेश कोळी
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बोदवड या शाखेतील कर्मचारी रमेश यादव तेलंग यांचे बनावट सही करून 270000 आठशे रुपये रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत माहिती अशी की बोदवड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बोदवड विज बिल भरणा केंद्रावर कार्यरत असलेले निलंबित कारकून रमेश यादव तेलंग वय 57 यांचे कर्ज खात्यातील दिनांक सात जुलै 2017 रोजी जिल्हा बँकेच्या धंबोदवड शाखेचे तात्कालीन व्यवस्थापक दशरथ गोविंदा पाटील सध्या सेवानिवृत्त, कारकून अशोक भोपळे इंगळे व कॅशियर तुळशीराम भगवान पाटील यांनी संगनमताने रमेश तेलंग यांच्या खात्यातून शंभर रुपये उसने मागितले तेव्हा रमेश तेलंग यांनी खात्यात असलेल्या रकमेतून स्लिप भरून दिली त्या स्लीपर खाडाखोड करीत त्यातील कर्ज खात्यात असलेली रक्कम दोन लाख सत्तर हजार आठशे रुपये काढूनआपहार केला याबाबत श्री रमेश तेलंग यांनी जळगाव जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र जयंतराव देशमुख व भरत रामदास पाटील प्रशासन व्यवस्थापक यांच्याकडे चार वेळा तक्रार अर्ज दिला त्यांनी कोणतीच कारवाई न करता उलट उच्च पदाचा गैरवापर करून खोट्या आरोपाची शहानिशा न करता ताकीद सूचना किंवा नोटीस न देता जेडीसीसी बँकेच्या बोदवड शाखेतून निलंबित व कार्यमुक्त केले श्री रमेश तेलंग हे अनुसूचित जातीचे असल्याने ग्राहकांसमोर अपमान करून जातीवाचक शिवीगाळ करून बँकेत नोकरी करू नये म्हणून याकरिता जातीय छळ केला याबाबत रमेश तेलंग यांनी जळगाव येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री ननवटे यांच्याकडे तक्रार दिली होती या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे विभागाने अधिक तपास करून बोदवड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले यावरून बोदवड शाखेचे शाखा व्यवस्थापक दशरथ गोविंदा पाटील सध्या सेवानिवृत्त ,अशोक भोपळू इंगळे कारकून, तुळशीराम भगवान पाटील कॅशियर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र जयंतराव देशमुख, प्रशासकीय व्यवस्थापक भरत रामदास पाटील यांच्याविरुद्ध बोदवड पोलीस स्टेशनला भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 2019 दिनांक 02:10 2019 भारतीय दंडविधान कलम 420 409 417 419 465 468 471 506 सह कलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 आर व एस प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल किसन खरे करीत आहे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन रोहिणी ताई खेवलकर खडसे या आहेत, श्री रमेश तेलंग हे आपल्यावर झालेल्या अन्यायाचा दोन वर्षापासून पाठपुरावा करीत होते श्री तेलंग यांनी 270000 आठशे रुपये ही रक्कम मुलीच्या लग्न कामासाठी ठेव म्हणून बोदवड शाखेच्या खात्यावर जमा ठेवली होती ,बोदवड जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये दोन वर्षांपूर्वी जवळपास सत्तर लाखाच्यावर घोटाळा उघडकीस आला होता, या बँकेतील खातेदारांचे लाखों रुपये बुडाले आहेत , खातेदारांना अद्यापही बँकेकडून कोणतीही रक्कम परत मिळाली नाही यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून जनतेचा या बँकेवरील विश्वास उडाला कि काय असे दिसून येते, बोदवड जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील अनेक खातेदारांनी आपले खाते बंद केले आहे







