जनसुराज्य ग्रामविकास मंडळाची सहविचार सभा सपन्न
किरण चव्हाण
अमळनेर-(दि 15) अमळनेर येथील जवळच असलेल्या खेडी(प्र.ज) येथे मकरसंक्रांत निमित्ताने जनसुराज्य ग्रामविकास मंडळ खेडी खुर्द व सिम(प्र ज)या संस्थेची संध्याकाळी सात वाजता नवीन सामाजिक सभागृहात सहविचार सभा संपन्न झाली
सभेची सुरुवात तीळगुळ वाटपाने झाली. गावाच्या विकासासाठी समविचारी मंडळी एकत्र येऊन एक नवीन संस्था स्थापन करून त्यात प्रत्येक घटकांचा समावेश करण्यात आला आहे विकास हेच उद्दिष्ट ठेवून त्यावर चर्चा झाली
या संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, व सभासद वर्गाचे अभिनंदनिय ठराव या वेळी करण्यात आले.संस्थेचे पंचवीस सदस्यीय असलेल्या व मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
गावाचा शास्वत विकासावर भर देऊन विविध प्रकारचे ठराव करण्यात आले त्यात प्रामुख्याने,अभिनंदनिय ठराव, संस्थेचे बॅंकेत बचत खाते उघडणे, अध्यक्ष व सचिव यांना सह्याचे अधिकारी देणें, सण, समारंभ, उत्सव संस्थेच्या माध्यमातून साजरा करणे,शेताला जोडणारा रस्ता दुरुस्ती करणे, देणग्या स्वीकारणे,चराई साठी जंगल करार तत्त्वावर देणे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सुविधा उपलब्ध करून देणे या सह अनेक ठराव करण्यात आले
सभेच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानदेव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष पद्माकर पाटील उपस्थित होते
उपाध्यक्ष प्रबोधन पवार,सचिव तानाजी पाटील, सहसचिव किरण पाटील,खजिनदार ज्ञानेश्वर शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर सभासद, भिकाजी पाटील, सुनिल पवार, राजेंद्र पवार,अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, भास्कर पाटील, राजेंद्र पाटील,शांतीलाल पाटील,सरवर पिंजारी,नागो चव्हाण, राजू नाईक, नितीन न्हावी, किसन पाटील,वाय डी शिंदे,नंदलाल पाटील,हे उपस्थित होते
सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले तर आभार विलास शिंदे यांनी मानलेत






