Amalner

गांधली पांझर तलाव 90 टक्के भरल्याने 10 ते 15 गावांना मिळणार जलशांती आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने तलावाची दुरुस्ती झाल्याने साचले पाणी

गांधली पांझर तलाव 90 टक्के भरल्याने 10 ते 15 गावांना मिळणार जलशांती

आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने तलावाची दुरुस्ती झाल्याने  साचले पाणी

गांधली पांझर तलाव 90 टक्के भरल्याने 10 ते 15 गावांना मिळणार जलशांती आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने तलावाची दुरुस्ती झाल्याने साचले पाणी

अमळनेर तालुक्यातील गांधली पांझर तलावाची काळाच्या ओघात प्रचंड दुरवस्था झाली असताना आ.शिरीष चौधरींनी लक्ष घालत 60 लाख निधीतुन हा तलाव पुनर्जीवित केल्याने यंदाच्या समाधानकारक पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून हा तलाव तब्बल 90 टक्के भरला आहे, यामुळे गांधली सह परिसरातील 10 ते 15 गावात जलशांती निर्माण होऊन शेतकरी व ग्रामस्थांना सुगीचे दिवस येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
             काही दिवसांपूर्वी आ.चौधरींनी या तलावाच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर त्यांच्याच सूचनेनुसार पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम जोमाने करण्यात आले होते.अखेर त्यांचे प्रयत्न सफल ठरले आहेत, या तलावाची साठवण क्षमता 671. 54 दशलक्ष घनमीटर,तर सिंचन क्षमता 144.00 हेक्टर, आहे, तलावाची लांबी 2017 मीटर तर उंची 9 मीटर आहे. गांधली, पिळोदा, नगाव, कचरे, देवगाव-देवळी, धुपी, पिपळी, दहिवद गावांसह 10 ते 15 गावांना याचा फायदा होणार आहे.काळाच्या ओघात नादुरुस्त झालेल्या गांधली पाझर तलावाच्या दुरुस्तीकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्द करून घ्यावा अशी मागणी आ शिरीष चौधरी यांनी  जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळोवेळी केली होती,अखेर  यात त्यांना यश येऊन नियोजन समितीने या तलावाच्या दुरुस्तीसाठी 59.52लाख  निधीस मंजुरी दिली होती.             
            दरम्यान अमळनेर मतदार संघात सर्वात मोठा असलेल्या या गांधली पिळोदा पाझर तलावाचे काम 1994,95 मध्ये करण्यात आले होते,बांधकाम दगडामध्ये करण्यात आले होते,परंतु काळाच्या ओघात बांधकामास मोठया प्रमाणात जाऊन पाझर तलावावर मोठया प्रमाणात झाडे झुडपे वाढलेले होते,तसेच भरावांचे मोठया प्रमाणावर संकोचन झाले होते,गाभा भराव व पायाभूत पाणी पांझरण्याचे प्रमाण देखील खूप वाढले होते.सांडवा व पक्ष भिंतींचे बांधकाम बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत येऊन तलावाचा गाभा भराव साखळी अतिवृष्टीत वाहून गेल्याने पाणीसाठा शून्यटक्के झाला होता.अमळनेर तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे चार वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती असताना,हा तलाव शेतकर्याना खूपच फायदेशीर असल्याने तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्द व्हावा अशी मागणी आ चौधरी यांनी केली होती,त्याअनुषंगाने हा निधी मंजूर होऊन तो पुनर्जीवित व जलमय देखील झाल्याने शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत असून आ.चौधरींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button