Amalner

आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे अडथळे झाले दूर सुधारित संकल्पनाबाबत बैठकीत झाला निर्णय, प्रस्तंभाचे काम जलदगतीने होणार

आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे अडथळे झाले दूर

सुधारित संकल्पनाबाबत बैठकीत झाला निर्णय, प्रस्तंभाचे काम जलदगतीने होणार

आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे अडथळे झाले दूर सुधारित संकल्पनाबाबत बैठकीत झाला निर्णय, प्रस्तंभाचे काम जलदगतीने होणार

अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या प्रस्तंभाचे अडथळे आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी दूर झाले असून याबाबत दि 28 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सुधारित संकल्पनेबाबत निर्णय झाला असून प्रस्तंभाचे काम  जलदगतीने होणार असल्याने याबाबत अधिक तांत्रिक माहिती देताना आ.शिरीष चौधरींनी सांगितले की प्रस्तंभाचे सुधारित संकल्पन अधिक्षक अभीयंता (धरण) मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना यांचे पत्र क्र.म.सं.सं./अ. अ./द ध /ता 2/निम्न तापी/115 दि. 31 मे 2017 अन्वये प्राप्त झाले होते. मंडळ कार्यालयाचे पत्र क्र.प्रशा/ तां-5/ निता 238/2/ 2503/ सन 2018 दि. 16 एप्रिल 2018 अन्वये प्रस्तंभाचे काम तातडीने सुरु करणे
गरजेचे असल्याने म.सं.सं. तर्फे प्रस्तंभाचे संकल्पन त्वरीत अंतीम करुन मिळणेबाबत मा. मु. अ. म.सं.सं. यांना शिफारस व्हावी ही विनंती करण्यात आलेली होती. तसेच महामंडळ कार्यालयाचे दि. 8 मे 2018 च्या पत्रान्वये मु.अ. म. सं. सं. नाशिक यांना प्रस्तंभाचे सुधारीत संकल्पन अंतीम होण्यास विनंती करण्यात आलेली आहे.

आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे अडथळे झाले दूर सुधारित संकल्पनाबाबत बैठकीत झाला निर्णय, प्रस्तंभाचे काम जलदगतीने होणार

तसेच प्रस्तंभाचे सुधारीत संकल्पना बाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. शासनाचे दि.20 नोव्हेंबर 2018 च्या पत्रान्वये मुख्य अभियंता, मसंसं नाशिक यांचे अभिप्राय मागविण्यात आलेले होते. प्रस्तंभ संकल्पनाबाबत सचिव प्रकल्प समन्वयक मंत्रालय मुंबई यांच्या दालनात दि. 25 जून 2019 रोजी बैठक संपन्न झाली होती. तदनंतर दि 28 ऑगस्ट 2019 रोजी बैठक झाली त्यात सुधारीत संकल्पानाबाबत निर्णय झाला असुन प्रस्तंभाचे कामाचे अडथळे दुर झाले आहेत.यामुळे प्रस्तंभाचे काम करणे शक्य होणार असल्याचे तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले.

           पाडळसरे प्रकल्पाबाबत सततच्या प्रयत्नांमुळे व जनतेच्या अपेक्षामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन झाला असून नुकतीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाबार्ड अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कर्जातून 1500 कोटी पाडळसे धरणास देण्याबाबत मंजुरी दिल्यानंतर इतर तांत्रिक अडथळे देखील प्राधान्याने दूर केले आहेत. आता या धरणाचे काम कुणीही थांबवू शकणार नाही असा विश्वास आ.शिरीष चौधरींनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button