कोरोनाच्या काळात शहीद झालेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देण्यासाठी युवकाचा महाराष्ट्रभर सायकलने प्रवास
अजहर पठाण
सध्या कोरोना महामारीच्या काळामध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत असताना कोरोनाची लागण होऊन शहीद झालेल्या कोरोणा योद्धा बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उमेश दळवी या 30 वर्षीय युवकाने महाराष्ट्रातील सर्वात 36 जिल्हे सायकलवर प्रवास करून अनोख्या पद्धतीने शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी
मुंबई 4 हजार किलोमीटर पार करण्यासाठी सायकलवर प्रवास सुरू केला आहे.
मुंबई येथून 19 सप्टेंबर पासून प्रवास सुरू करीत या युवकाने ठाणे पालघर त्याचबरोबर नासिक व नंदुरबार नंतर धुळ्यामध्ये प्रवेश केला यापुढे जळगाव कडे मार्गस्थ होत या युवकाने पुढे काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास करून शहिदांना श्रद्धांजली राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे…..






