आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे वागदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट
कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट
अक्कलकोट दि.28 :- तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी भेट देऊन कोरोना बाबत चर्चा डॉक्टर सुहास कांबळे व डॉक्टर सौ.साधना पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप जगताप , राजकुमार झिंगाडे, अप्पासाहेब बिराजदार, सुनील सावंत, कमलाकर सोनकांबळे,संतोष पोमाजी, प्रदीप पाटील, प्रकाश पोमाजी,वीरभद्र पुरंत, आदी उपस्थित होते. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी डॉक्टर व आरोग्यसेवक, आरोग्यसेविकांना स्वतःच्या आरोग्याचे काळजी घेण्याची सल्ला दिले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि ग्रामसुरक्षा दलाला भेट देऊन तेथील उपाययोजना व सुविधेची सर्व माहिती घेतली.यावेळी डॉक्टरांनी या महामारीसदर्भात येणारे सर्व धोके लक्षात घेऊन सर्व तयारी केल्याचे सांगितले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव यांनी गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करून गावामध्ये शांतता राखण्यासाठी व कोरोना व्हायरस रोखण्यासाठी चालले प्रयत्न व नियोजनाचे राजकुमार यादव व त्याच्या टीमचे कौतुक केले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कोरोनाचा मुकाबला आपण निश्चित करू शकतो असा आत्मविश्वास देत सर्वांनी स्वतःची व कुटुंबातील सर्व व्यक्तीची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.






