आटपाडीचा राहुल नवले प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी उत्तम बालटे
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे MA, भाग 2 मध्ये शिकत असलेला राहुल नवले यांना,२२संप्टेंबर २०१९ राजी आतंरराष्ट्रीय महिला दिवशी भारत सरकार नीती आयोग संचलित महिला प्रशिक्षण संस्था, घजियाबाद ,उत्तर प्रदेश याच्या मार्फत देण्यात येणाऱ्या प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार ने सन्मान करण्यात आला,
गेली चार वर्ष झालं महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून समाजप्रभोधन, तसेच निस्वार्थ पणे समाजात केलेले कार्य,पूरग्रस्त भागात जाऊन मदत करणे, पथनाट्य द्वारे वेगवेगळ्या योजनांची जनजागृती करणे,या सर्व कार्याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या कार्यक्रमात देशातून वेगवेगळ्या
राज्यामधून निवड केलेल्या प्रभावशाली व्यक्तींना प्राईड ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी देशातून 3000 लोकांनी प्रस्ताव केला होता. त्यातून वेगवेगळ्या क्षेत्राततुन 100 जणांची निवड करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या मध्ये आटपाडी मधील राहुल नवले या युवकाला सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्ष सौ.शैली शेठी व इतर मान्यवरांनी राहुल नवले यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला गेला .






