विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनोखा उपक्रम ! राजीव गांधी यांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर मधील शिरसोडी मध्ये विद्यार्थी व पालकांची अनोखी कार्यशाळा पार पडलीय.ग्रामीण भागातीक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची योग्य दिशा मिळावी यासाठी शिरसोडी येथील कै.नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालयात विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्रदादा रेडके, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचे संचालक अतुल व्यवहारे, माजी संचालक सतिष व्यवहारे,केंद्रप्रमुख शेषराव राठोड ,खरेदी विक्रि संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब चोरमले , शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल,शिक्षक पतसंस्थेचे उपसभापती वसंत फलफले मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे उपस्थित होते.
ज्यावेळी कोणताही विद्यार्थी हा इयत्ता चौथी पास होतो. त्यानंतर त्याला पुढील शिक्षण पायरी चढायची असते.मात्र अशा वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शिक्षणाची दिशा माहीत नसते. यासाठी चौथीच्या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची परिक्षा आयोजित करत त्यांना स्पर्धा परिक्षा, सैनिक स्कूल,नवोदय विद्यालय याबांबत मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थी हे हुशार आहेत. मात्र त्यांना जर योग्य दिशा जर मिळाली योग्य शिक्षण पध्दतीने तो विद्यार्थी नक्कीच राष्ट्राच्या कामी येऊ शकतो.राजीव गांधी यांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आलीय.याचा संपुर्ण खर्च केंद्र शासन करित असून ग्रामीण भागातील मुलांकरिता ८० टक्के जागा राखीव असतात.याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पस्तीस जिल्हा परिषद शाळांमधून ४५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला होता.या सर्व विद्यार्थ्यांना नागेश नरळे फलटण यांनी मार्गदर्गन केले. पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाची योग्य दिशा समजली तर विद्यार्थ्यांची योग्य दिशेने वाटचाल होऊन त्याचा विकास होईल या मुख्य उद्देशाने ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्याचे आयोजक महेंद्रदादा रेडके यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विकास फलफले यांनी केले सर्वाचे आभार रमेश जाधव यानी मानले.






