आखाडा विधानसभेचा
अमळनेर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे अंतर्गत कट कारस्थाने आणि व्यूहरचना.. कोण मारणार बाजी…
अमळनेर
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अमळनेर तालुका यापूर्वी अनेक वाईट गोष्टींसाठी राजकीय क्षेत्रात सम्पूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. अत्यन्त संवेदनशील म्हणून ओळखला जातो.गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील राजकारण बदललं असून या गोष्टी ला अनेक घटक जबाबदार आहेत.
- 2009 10 या विधानसभा निवडणुकीत पैसे वाटप ही संकल्पना अमळनेर येथे रुजविण्यात आली.खोऱ्याने पैसा ओतून आमदारकी मिळवली.अनेक ठिकाणी दान,देवाची मंदिरे,समाज मंदिर इ साठी पैसा देऊन अमळनेर मतदारसंघातील जनतेला विकत घेतले. आणि अमळनेर जनतेच्या कपाळावर “विकाऊ अमळनेर” म्हणून शिक्का बसला. या अगोदर देखील पैसा हा फॅक्टर काम करीत होता परंतु त्याला मर्यादा होत्या.माजी आमदारांनी तर उघड उघड जनतेला विकत घेतले आणि नंतर नारा लावला की “मीही खाणार नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देणार नाही.”आणि पैसे वाटप चा आरोप मात्र विद्यमान आमदार यांच्या वर करण्यात आला.
- जातीय राजकारण हे अमळनेर च्या पाचवीलाच पुजलेले आहे कारण एकाच समाजाची मोनोपॉली या मतदारसंघात कायम राहिली आहे.आमदार शिरिषदादा चौधरी यांनी ही मोनोपॉली मोडत अमळनेर मतदारसंघात नवा अध्याय लिहिला.मागच्या 2014 च्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करत हाणामारीही झाली.त्यामुळे तालुका आणखी चर्चेत आला. अर्थात त्या हाणामारी मागील “राजकारण” “डावपेच” नंतर सामान्य जनतेला समजले.आताही अमळनेर वरून शांत वाटत असले तरीही आतून मात्र अनेक खेळी खेळल्या जात आहेत. अनेक डावपेच विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांना अयशस्वी करण्यासाठी रचले जात आहेत. आताच्या विधानसभा निवडणुकीत अनेक फॅक्टर काम करणार आहेत.यात जातीयवादी कार्ड जोरात वापरले जाणार असून ह्या एका मुद्द्यावर दोन्ही बाजूला कसरत सुरू आहे. सर्व सामान्य बहुजन जनता जातीय वादाला कंटाळून गेली आहे.
- महत्वाचा फॅक्टर आहे विकासकामांचा आता पर्यंत विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांनी सर्वात जास्त विकासकामे केली आहेत.श्रेयवादाच्या राजकारणाने तालुक्यातील मतदारांची चांगलीच करमणूक झाली आहे.
- मुद्दा आहे स्थानिक आणि बाहेरील उमेदवार हा..हा मुद्दा माजी आमदार याांच्या वेळी उपस्थित झाला नाही परंतु आता मात्र या मुद्द्याला अनुसरून स्थानिक जनतेची सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- महत्वपूर्ण मुद्दा आहे पाडळसरे धरण पूर्तीचा कारण हा तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे.संपूर्ण तालुक्यातील विकास आणि पाणी प्रश्न या धरणाच्या पूर्णत्वामुळे सुटणार आहे. गेली 20 वर्ष स्थानिक राजकीय लोक प्रतिनिधींनी ह्या गोष्टीच गाजर जनतेला खाऊ घातलं आणि हा विषय कॅश व्हॅल्यू वाढल्यामुळे इतका मोठा झाला आहे की राज्य पातळीवर सुटणे शक्य नसून केंद्रीय मदती शिवाय पूर्ण होणे शक्य नाही. हे जनतेने समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून पुन्हा जर हे गाजर कोणी खाऊ घालत असेल तर त्याला बळी पडू नये.
- जनतेशी असलेल्या संपर्काचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक आल्या नंतर कामाला लागले गेली पाच वर्षे ते झोपून होते अचानक त्यांना जाग आली आहे. त्या तुलनेत आमदार शिरिषदादा चौधरी यांचा समाजातिल प्रत्येक घटकांशी सम्बध असून त्यांनी ते अत्यन्त आपुलकीने जपले आहेत.राहिली गोष्ट इतरांची त्यांना अमळनेर मधील अनेक गोष्टींची खबरच नसते.







