Parola

आईवडिलांना अभिमान वाटेल असे यश मिळवा पोलीस अधीक्षक संजय पाटील तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा

आईवडिलांना अभिमान वाटेल असे ‘यश’ मिळवा 
पोलीस अधीक्षक संजय पाटील
तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा

आईवडिलांना अभिमान वाटेल असे यश मिळवा पोलीस अधीक्षक संजय पाटील तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा

पारोळा प्रतिनिधी –  कमलेश चौधरी
स्वप्ने जरूर बघवीत मात्र उघड्या डोळ्यांनी आणि स्वप्ने तीच खरी असतात जी झोपू देत नाही.स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या अन आई वडिलांना,समाजाला अभिमान वाटेल असे यश मिळवा असे प्रतिपादन अधीक्षक राज्य राखीव पोलीस धुळे संजय पाटील (चौधरी) यांनी केले.
तेली भुवन येथे तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा व सेवपूर्ती व्यक्ती सत्कार कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होते.त्यावेळी अधक्ष्यस्थानावरून ते बोलत होते.

आईवडिलांना अभिमान वाटेल असे यश मिळवा पोलीस अधीक्षक संजय पाटील तेली समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा
दहावी,बारावी,पदवीधर शिक्षणात व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर माजी उपनगराधक्ष्य रेखा चौधरी, नगरसेवक कैलास चौधरी,नगरसेवक नवल सोनवणे,महेश चौधरी,अशोक चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष वामन चौधरी, अशोक चौधरी,माजी अधक्ष्य अरुण चौधरी,एस बी चौधरी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पाटील पुढे म्हणाले की,
सोशल मिडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे तारुण्य हे शिक्षणाचे वय आहे.वर्गातला अभ्यासापेक्षा जगाचा अभ्यास अवगत केला पाहिजे.डॉक्टर,इंजिनिअर हेच यथासांग करिअर न निवडता स्वतःची वेगळी वाट निर्माण करून त्यात प्रगती साधली पाहिजे असे सांगत डाँ ए पी जे अब्दुल कलाम यांनी वेगळी वाट शोधून जगविख्यात शास्रज्ञ झाल्याचे नमूद केले.काहीही बना मात्र नाळ मातीशी जोडून ठेवा पाय जमिनीवर असू द्यावा.स्पर्धा स्वतःशी करावी दररोज नवनवीन पुस्तकांचे वाचन करा,चिंतन करा मनन करा,निरीक्षण करा असा मौलिक सल्लाही अधीक्षक पाटील( चौधरी) यांनी उपस्थितांना दिला.
अभ्यास समजून घ्या; घोकंपट्टी करू नका-चंद्रकांत चौधरी
विद्यार्थ्यांना प्रेरणा,प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप पडली की त्याच्यात उमेद जागृत होते.अन उमेदीतूनचं भविष्य घडत असते असे सांगत ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी खचून जावू नये आणि ज्यांना मिळाले त्यांनी हवेत उडू नये.गुणवत्ता प्रत्येकात असते फक्त ज्याने जेवढी मेहनत घेतली तेवढे त्याला यश मिळत असते.अभ्यास करतांना टॉपिक समजून घ्या नुसतीच घोकंपट्टी करू नका असा मौलिक सल्ला गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी दिला.
–परिश्रमाशिवाय यश नाही
शिक्षण म्हणजे आयुष्याची किल्ली आहे.शिक्षणातू भविष्य घडते आणि भविष्यातूनच समाज घडत असतो. शिक्षणासाठी झटले पाहिजे,धडपड केली पाहिजे अंगी जिद्द,चिकाटी आगीकरून कठोर परिश्रम घेतले पाहिजे कठोर परिश्रमाशिवाय यश मिळणे अवघड आहे असे मत जिल्हा उपाध्यक्ष वामन चौधरी यांनी व्यक्त केले.
त्यावेळी भाजपा शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिव भरत चौधरी,संजय चौधरी,सुनील चौधरी,नवयुवक मंडळाचे अधक्ष्य गोपाल चौधरी,उपधक्ष्य राहुल चौधरी,गोलू चौधरी,गोपाल चौधरी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन धर्मदास चौधरी तर प्रास्तविक अनिल चौधरी यांनी केले.
या सेवपूर्तीचा झाला सत्कार
माजी प्राचार्य संजय भिका चौधरी, प्रा मधुकर आंनदा चौधरी, न पा कर्मचारी वासुदेव चौधरी, माजी पी स आय प्रेमचंद भोजू चौधरी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button