Pandharpur

इटली ची लोकसंख्या सहा कोटी आहे तर ही अवस्था भारता ची 130 कोटी विचार करा लहान दवाखाने बंद ठेवले तर कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात थांबू शकतो…..श्री एस के चव्हाण सर

इटली ची लोकसंख्या सहा कोटी आहे तर ही अवस्था भारता ची 130 कोटी विचार करा लहान दवाखाने बंद ठेवले तर कोरोनाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात थांबू शकतो…..श्री एस के चव्हाण सर

प्रतिनिधी रफिक आतार

भारत देशामध्ये व ग्रामीण भागांमध्ये आणि शहरी भागामध्येअजूनही लोकांनी कोराना ला खूप हलक्यात घेतल आहे.. दवाखान्यात येणाऱ्या पेशंट ना वरोवर सांगून ही ते बिना तोंड झाकता येत आहेत.डॉक्टर्स , स्टाफ व इतर पेशंट च्या तोंडा समोर डायरेक्ट खोकत आहेत. या विषयाचं गांभीर्य अजुनही काही शिकलेल्या लोकांनाही समजलेलं नाही. दवाखान्यात २ पेशंट जर सर्दी खोकल्याचे असतील तर इतर 8 पेशंट हे बाकीच्या आजाराचे आहेत.चुकून जर त्या मध्ये एखादा कारोना positive असला कीव जर कोरोना कॅरियर ( म्हणजे काहीच लक्षणे नसतात पण त्याला कोरोनाची लागण झालेली असते असा पेशंट)असेल तर तो पेशंट त्याच्या संपर्कात आलेल्या इतर चांगल्या पेशंटना लागण करू शकतो.अता हे पेशंट आपल्या घरी हिच लागण घेऊन जातात.यात त्या निष्पाप पेशंटची काहीही चूक नसते.पण हाच पेशंट जो इतर कीरकोर आजरा साठी आलेला असतो तो त्याचा घरातील त्याचे आई वडील बायको मुलांना याची लागणं करतो.मग हे सर्व लोक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक लोकांना कारोनाचा प्रसार करतात.आणि मग १ चे ४,८,१६,३२ हे प्रमाण वाढतं जात….

बरं हे झालं पेशंट संदर्भात आता चुकून डॉक्टर्स ना जर लागण झाली तर त्या डॉक्टर्स कडे येणाऱ्या प्रत्येक पेशंट ला कोरोणाचा प्रसाद या डॉक्टर्स कडून मिळतो…मग समजा एक साधा डॉक्टर एका दिवसात २५ पेशंट पाहत असेल तर तो ८ दिवसात २०० आणि १६ दिवसात जवळ पास ४०० पेशंट ना बाधित करू शकतो.या आजारच जो incubation कालावधी हा ७ te १४ दिवसाचा आहे.(म्हणजे या दरम्यान लागण झालेली ती व्यक्ती आपण ओळखू शकत नाही कारण ती बऱ्याच वेळा कोणतेही लक्षण दाखवत नाही.) याची कल्पना माझ्या सर्व सामान्य गावकऱ्यांना कदाचित नाही…या मुळेच इटली सारखा प्रगत देश जो जागा मध्ये वैद्यकीय क्षेत्रा मध्ये २ नंबर ला आहे तो आता अक्षरशः रडत आहे…आणि आपला देश तर जगा मध्ये पहिल्या १०० मध्ये पण नाही.विचार करा आपली काय अवस्था होईल…
आता या कोरोनचा फैलव फक्त सर्दी खोकल्याने होत नसून तो त्या पेशंट ने स्पर्श केल्याल्या प्रत्येक वस्तू मूळे ही १००% होतोय. उदाहरण.समजा कोरोनाच एक पेशंट दवाखान्यात आल्या नंतर दवाखान्याच्या दरवाजा पासून खुर्ची, बाकडा,पेशंट झोपायच्या टेबल ,कॉट प्रत्येक ठिकाणी त्याचा स्पर्श होत असतोच आणि त्याच ठिकाणी इतर चांगले पेशंट ही स्पर्श करत असतात, झोपतात.आणि तोच हात जर त्यांनी तोंडाला,नाकाला लावला तर मग कोरोणाची लागणं होते.म्हणून सरकार सारखं बोंबलत आहे की वारंवार हात निर्जंतुक साबणाने कीव hand sanitizer ne धुवा.पण आमच्या लोकांच्या हे अजून हि लक्षात येतं नाही.
आता लहान दवाखान्यात हे टाळायचं असेल तर प्रत्येक पेशंट येऊन गेल्या नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू ,पेशंट तपासणी साठी वापरलेलं साहित्य उदा. टेथेस्कोप पासून ते बाकडयान पर्यंत.दरवेळी पुसून निर्जंतुक करूनच मगच पुढचा पेशंट तपासावा लागणार आहे..पण अपुऱ्या पूरावठ्या अभावी हे शक्य नाही.( आपण लहान दवाखाण्या विषयी बोलत आहोत. जिथे हे सर्व करायला ना स्टाफ असतो कीव हे परवडणार ही नसत ) नाहीतर याची किंमत डॉक्टर्स आणि निष्पाप पेशंट ना चुकवावी लागेल.

आता सध्या तरी या गोष्टीची पूर्तता सरकार ला शक्य नाही.मला स्वतः ला डॉक्टर असून चांगल्या प्रतीचा handwash मिळालेला नाही..तर सर्व सामन्याची कोण ऐकणार.मी सरकार ला दोष देत नाही.ते प्रयत्न करत आहे.आपण जागे होऊन आपल्या देशाला या मोठ्या संकटातून वाचूऊया.एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही. गांभीर्य लक्षात घ्या.घरातून बाहेर पडू नका.प्रतिबंध हा एकच उपाय आता आपल्या हता मध्ये आहे.कृपाया गाव मधील माझ्या मित्रांना कळकळीची विनंती आहे की आता काट्यावर एकत्र बसून गप्पा मारणे बंद करावं लागेल.(सर्वच बाहेरून आलेले व इथं राहणारे)

घरीच रहा एखादी emergency असेल तरच बाहेर पडा.
किरकोळ उपचारा साठी दवाखान्यात जाणे टाळा..आपल्या फॅमिली डॉक्टर्स ना call करून उपचार घ्या.गरज पडल्यास व्हिडिओ कॅल द्वारा कॉन्टॅक्ट करा.पण घरीच थांबा पुढचे १५ दिवस खूप महत्वाचे आहेत.
*घरी थांबा देश वाचवा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button