राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी जाकिर मिया मुसा मिया जहागीरदार यांची नियुक्ती..
धुळे / असद खाटीक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक यांच्या संमतीने सेलच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी जाकिर मिया मुसा मिया जहागीरदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले. जहागीरदार हे पक्ष बळकटीसाठी महत्त्वपूर्ण काम करतील, असा विश्वास ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनिल तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. निलेश लंके, सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस अक्रम तेली उपस्थित होते.






