Pune

राज्यातील साखर उद्योगाला नव्या विचाराने पुढे न्यायला हवे — अंकिता पाटिल

राज्यातील साखर उद्योगाला नव्या विचाराने पुढे न्यायला हवे — अंकिता पाटिल

पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर

देशातील एकूण पाच कोटी ऊस उत्पादकांपैकी दीड कोटी उत्पादक शेतकरी एकटय़ा महाराष्ट्रातच असून त्यांच्यापुढे पाण्याच्या उपलब्धते पासून अधिक पावसाच्या समस्या उभ्या आहेत. सुमारे एक कोटी मेट्रिकटन साखरेचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे सहकारी क्षेत्रातील अग्रेसर राज्य असले, तरीही साखर उद्योग सध्या खूपच अडचणीत आला आहे. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे आज पुणे येथे Sugar Conlave साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन संचालक व इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन संचालिका कु. अंकिता हर्षवर्धन पाटील या परिषद प्रसंगी उपस्थित होत्या.
अतिरिक्त उत्पादनामुळे देशात साखरेची मागणी कमी होत आहे. साखर कारखानदारांनी साखरेबरोबरच इथेनॉल आणि वीजनिर्मितीचेही प्रकल्प सुरू करून या उद्योगाला भरारी देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सरकारी धोरणे आणि प्रत्यक्ष कारखान्यावरील अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी ही परिषद कारखानदारांसाठी उपयोगी ठरणार आहे. साखरेच्या निर्मितीचा खर्च आणि विक्री यांचे आर्थिक गणित जुळवताना कारखान्यांची मोठीच पंचाईत होते. अशा परिस्थितीत राज्यातील साखर उद्योगाला नव्या विचारांनी पुढे जावे लागेल.

यासाठी या साखर परिषदेत कारखानदारांना मार्गदर्शन होऊ शकेल. राज्याच्या विविध भागांतील साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यामुळे सर्वसमावेशक चर्चा घडूनआली. असे प्रतिपादन कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी परिषदेत प्रसंगी व्यक्त केले.या परिषदेच्या उपस्थितांमध्ये सर्वात तरुण कु. अंकित हर्षवर्धन पाटील या होत्या. वयाने जरी लहान असल्या तरी कारखानदारी सहकार व साखर उद्योगातील सर्व गोष्टींचा त्यांचा अभ्यास त्यांच्या भाषण शैली व चर्चेच्या विषयांमध्ये स्पष्ट दिसून येत होते.

या साखर परिषदेत उपस्थित कारखानदारांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मा.दिलीपजी वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाशजी नाईकनवरे व इतर तज्ञ मान्यवर उपस्थिती होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button