Ausa

Breaking: रणधुमाळी 2024: पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली…

Breaking: रणधुमाळी 2024: पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली…

उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरदेखील होते. काल जालना येथे दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्या धाराशिव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत. उमरगा विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. केज मतदार संघामध्ये नितीन गडकरी यांची सभा होणार आहे सकाळी 11 ते 12 दरम्यान ही सभा सुरू होईल.

वणी येथेही तपासल्या होत्या बॅगा

उद्धव ठाकरे काल यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी असतानाही त्यांच्या बॅगांची तपासणी झाली होती. हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते. त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओदेखील शूट केला होता. तसंच निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडीओ शूट करुन मला पाठवा असं सांगितलं होतं.

भास्कर जाधवांची प्रतिक्रिया
हे खूप संतापजनक आहे. देशातील लोकशाही संपुष्टात येतेय की काय? असा प्रश्न पडतोय.हा महाराष्ट्रातल्या माणसांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दिले. केवळ विरोधकांच्या बॅगा का तपासता? अजित पवार यांची राष्ट्रवादी, भाजपच्या बॅगा का तपासल्या जात नाही? असा प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button