sawada

कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेशाचे काटेकोरपणे लोकांनी पालन करावे कर्तव्यदक्ष सपोनि देवीदास इंगोले यांनी केले आवाहन

कोरोना संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेशाचे काटेकोरपणे लोकांनी पालन करावे कर्तव्यदक्ष सपोनि देवीदास इंगोले यांनी केले आवाहन

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यात कोविड ची आलेली दुय्यम लाट वेगाने पसरून दिवसेंदिवस कहर करीत आहेत महणून चिंतेचा विषय होत चाललेला आहे आजही ११२४ कोरोना बाधित रुग्ण नव्याने संपूर्ण जळगांव जिल्ह्यात आढळून आले आहेत दैनंदीन रुग्ण संखया वेगाने वाढीत असुन चिंताजनक स्थीती झालेली आहेत

कोरोना महामारी आलेली दुसरी जहरी लाटच्या कहर पासून लोकांचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण जळगांव जिल्ह्यात दि २८ मार्च रोजी रात्री १ वाजे पासून ते ३० मार्च २०२१रोजी रात्री १२ वाजे पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ सह लागू केलेले विशेष निर्बंध चे सर्व नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे व स्वत: चे आणि दुसऱ्यांचे जीव वाचवणे कामी दक्षता घेणे गरजेचे आहे

महणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तीन दिवसा करीता सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार, किराणा दुकाने, कीरकोळ भाजीपाला,फळे खरेदीविक्री केंद्र,सर्व शाळा कॉलेज, हाटेलस,सभा, सार्वजनिक कार्यक्रम, पान टपऱ्या,गार्डन्स, धार्मीक स्थळ,सन उत्सवा इत्यादि महणजे आदेशात नमुद १ ते १६ अटींचे पालन करुन सर्वांनी सहकार्य करावे ,या काळात फक्त वैद्यकीय सेवा, मेडिकल, दूध केंद्र ,ॲम्बुलन्स सेवा , अतिआवश्यक वाहने ,कोवीड लसीकरण सेंटर सरू राहील तरीही नागरीकांनी सदरील लागू नियमांचे उल्लंघन करता कामानये किंवा कोणाकडून होता कामानये,अकारण जनतेने घरा बाहेर जावू नये, मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, रात्रीच्यावेळी रस्यांवर गल्ली बोळात इतर ठिकाणी टोळीकडून जमा होवून बसून लोकांनी गप्पा मारताना दिसूनये या ऐवजी स्वताचे आरोग्याविषयी काळजी घ्यावी नुकतेच गावात या गंभीर आजाराने एकाच कुटुंबातील ३ लोकांचे जीव गेल्याची दुखद घटना झाली *जान है तो जांहान है* असे आवाहन सावदा पोलिस ठाण्याचे ,कर्तव्यदक्ष सहा,पोलिस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी केले आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button