Amalner

बोरी,पांझरा आणि तापी चे वस्त्र हरण थांबणार… वाळू माफियांची रात्रीस खेळ चाले सिरीयल बंद…

बोरी,पांझरा आणि तापी चे वस्त्र हरण थांबणार…
वाळू माफियांची रात्रीस खेळ चाले सिरीयल बंद…

अमळनेर तालुक्यात सातत्याने वाळू माफियांनी वाळू चोरून तिन्ही नद्यांचे वस्त्रहरण करून नद्यांचे स्वरूपच बदलून टाकले होते.
रात्री चालणारा हा खेळ बंद होणार असून प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी आदेश जारी केले आहेत.
तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी नदीतील वाळू चोरीला आळा घालण्यासाठी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी वाहनांना प्रतिबंध केला असून
नदीपात्रातून वाळू चोरी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी वाळूमाफियांना दिला आहे. प्रातांधिकारी सीमा अहिरे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, की अमळनेर तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. महसूल विभागाचे पथकामार्फत अवैध गौणखनीज वाहतुकीबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, सध्या या तीनही नदीपात्रात अधिकृत टेंडर देण्यात आलेले नसून अवैध वाहतूकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बोरी, पांझरा व तापी या तीन नदीच्या पात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीने आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन तसेच सदर क्षेत्रात वाहनास प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने परवानगी दिलेल्या वाहनास लागू होणार नाही, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.
गावातील नदी पात्रात वाहनांना प्रतिबंध
तालुक्यातील अमळनेर, हिगोंणे खुर्द प्र. अ, फाफोरे खुर्द, फाफोरे बुद्रुक, फाफोरे बुद्रुक, बिलखेडे, कन्हेरे, खोकरपाट, बहादरवाडी, आमोदे, रंजाणे, जळोद, सावखेडा, मठगव्हाण, नालखेडा, दोधवद, हिंगोणेसीम प्र. ज., हिंगोणेसीम प्र. अ, मुंगसे, रुंधाटी, गंगापुरी, खापरखेडा, सात्री, डांगरी, बोहरे, कलाली, निम, शहापूर, तांदळी, ब्राम्हणे, भिलाली, बोदडे, कळंबे, मुडी, मांडळ या गावातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदीच्या पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या गावातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदीच्या पात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्‍याकडे निवेदने व लेखी मागणी करून तालुक्यातील रेती उपसावर प्रतिबंध घालण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रांता धिकारी सीमा अहिरे यांनी प्रत्यक्ष कृती करून नागरिकांना न्याय दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button