फैजपूर

शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण समारंभ

शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण समारंभ

सलीम पिंजारी
कृषी विज्ञान केंद्र,पाल मार्फत चोपडा तालुक्यातील लोणी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2019-20 अंतर्गत उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकावरील समूह पंक्ती प्रथम दर्शनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार केला जाणार आहे.एकूण २५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. त्यानिमित्त शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.या प्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांना भुईमूग पिकाची फुले भारती(जे एल 776) या जातीचे ६० किलो बियाणे,बीजप्रक्रिया करिता जिवाणू खते, कीडनियंत्रणासाठी कीडनाशके तसेच पिवळे चिकट सापळे निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आले.कार्यक्रम अध्यक्ष के व्ही के चे प्रभारी प्रमुख श्री.संजय महाजन उपस्थित होते यावेळेस अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.तांत्रिक चर्चा सत्रात मार्गदर्शक म्हणून श्री.सुधीर चौधरी (माजी प्रमुख, के व्ही के) यांनी भुईमूग पीक लागवड तंत्रज्ञान बाबत सखोल माहिती दिली.श्री नरेंद्र पाटील (प्रगतिशील शेतकरी) यांनी भुईमूग पीक बाबत अनुभव व्यक्त केले व श्री.महेश वि महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण) यांनी पीक प्रात्यक्षिक प्रकल्प व भुईमूग कीड रोग व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले तसेच शिवार फेरी च्या माध्यमातून विविध उपक्रमांची माहिती करून दिली. या प्रसंगी व्यासपीठावर श्री. डॉ.धीरज नेहेते,श्री.प्रमोद सरोदे तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button