बळीराजा शेतकरी संघटना अजित पवारांना काळे झेंडे दाखवणार — माऊली हळणवर
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : महाराष्ट्रात लाॅकडाऊनच्या काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवली आहे. हे वीज बील माफ करावे म्हणून वारंवार पाठपुरावा व आंदोलन केली.तरीही महावितरणे ग्राहकांची वीज तोडणी सुरू केली आहे. ज्यांनी वीज बिले भरली आहेत अशा शेतकर्याचे डीपी उतवरले आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दिले होते.त्यामुळे काही काळ दिलासा मिळाला होता. पण उर्जामंत्र्यांनी पुन्हा महावितरणाला थकीत बील वसुलीसाठी वीज तोडणीचे आदेश दिले आहेत.याच्या निषेधार्थ उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला 400 कोटी दिले जातात परंतु शेतकर्यांना वीज बिलात सवलत दिली जात नाही. उर्जा मंत्र्यांच्या बंग्लावर कोट्यावथी रूपयांची उधळपट्टी केली जाते. परंतु शेतकर्याना एक रूपया ही सवलत दिली जात नाही निवडणुकी पूर्वी शरद पवारांनी वीज बील भरू नये असे आवाहन केले होते आता त्यांचेच सरकार वीज बील वसुलीसाठी वीज कट करत आहे. दुटप्पी सरकारचा निषेध म्हणून उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निषेध केला जाणार अजित पवारांना निवडणुकीसाठी वेळ आहे परंतु शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत डीपी सोडवले जात आहेत तरी हे सरकार गांभीर्यानं घेत नाही म्हणून कोर्टी रोड येथे .शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी केले आहे






