Pandharpur

पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक अवचर यांच्या बदलीची अधिक्षक यांच्याकडे मागणी..

पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक अवचर यांच्या बदलीची अधिक्षक यांच्याकडे मागणी..

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांची बदली करावी या मागणीचे निवेदन सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पंढरपूर तालुका आम आदमी पार्टीचे सचिव नागेश पवार यांनी दिले आहे.पवार यांनी अवचर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनपरिक्षेञातील अनेक गावांमध्ये विविध प्रकारचे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे सुरू असल्याने पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या बदलीची मागणी केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सहकार, चंद्रभागा नदीकाठी असलेला मोठा तालुका व राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र याठिकाणी आहे येथे घडणार्या बारीक सारीक गोस्टींचेही पडसाद राज्यभर उमटत असल्याने येथिल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पहाता सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी गेल्या काही वर्षांपुर्वी पंढरपूर येथे पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन व्यतिरिक्त करकंब व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन या दोन नविन पोलिस स्टेशनची वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी व एका पोलीस स्टेशन वरील ताण कमी करण्यासाठी सर्व काही केले खरे परंतू पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमधिल वाढती गुन्हेगारी व अवैध व्यवसाय यावर अंकुश ठेवण्यास पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना अपयश येत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button