प्रलंबीत मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा अंगणवाडी कर्मचारी सभेचे आयोजन
विविध मागण्यांचे मंत्र्याच्या नावे दिले निवेदन
चिमूर प्रतिनीधी ज्ञानेश्वर जुमनाके
शालेय पुर्व शिक्षण व सकस आहारांची महत्वपुर्ण कर्तव्य करणाऱ्या अंगनवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्या मागील अनेक वर्षापासुन प्रलंबीतच आहेत . या मागण्यांच्या पुर्ततेकरिता चंद्रपूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र ) यांच्या वतीने आक्रोष मोर्चाचे आयोजन करण्यात आले .आपल्या न्याय मागण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान इखलाख कुरेशी यांचे नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा हुतात्मा स्मारक चिमूर येथुन निघुन एकात्मीक बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडकला
अंगणवाडी कर्मचारी सभा जिल्हा चंद्रपूर यांचे तर्फे केंद्र शासणाच्या सामान्य जनता तथा श्रमीक विरोधी निती विरोधात देशव्यापी संपाला पाठींबा तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून तसेच त्यांच्या समस्या सोडवून न्याय देण्यात याव्या या करीता मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . हुतात्मा स्मारक येथे शहिदांना श्रद्धांजली देऊन व त्यांच्या स्मृतीच्या साक्षीने दुपारी १.०० च्या दरम्यान जिल्हा कार्याध्यक्ष इमरान इखलाख कुरेशी यांच्या नेतृत्वात मोर्चास प्रारंभ झाला . न्याय मागण्या संबधात सरकारच्या उदासीन वृत्तीचा निषेध करूण शासण विरोधी घोषणा देत मूख्य मार्गावरून मार्गक्रमन करीत एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकला.
प्रलंबीत मागण्यांचे निवेदनात थकीत मानधनातील फरकाची रक्कम त्वरीत अदा करावी द्यावे , प्रधानमंत्र्यानी ११ सप्टेंबर २०१८ रोजी घोषीत केलेली मानधन वाढ द्यावी , निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनाच्या अर्धी रक्कम निवृत्ती वेतन म्हणुन मिळावे , एक रक्कमी सेवा निवृत्ती वेतन त्वरीत द्यावे , अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईलचे रिचार्ज शासनानेच करून द्यावा ,सेविका व मदतनिसांची रिक्त पदे त्वरीत भरावी , मिनि अंगणवाडीला मदतनिस देण्यात यावी . नगर पालिका क्षेत्रात प्रभागाची अट न ठेवता सेवा जेष्ठतेनुसार मदतनिसांना नियुक्त करण्यात यावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या .
महिला व बालविकास मंत्र्यांना सदर निवेदन एकात्मिक बालविकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी आशा कारदार यांचे मार्फत प्रतिनिधीक शिष्ठमंडळा द्वारे देण्यात आले . शिष्ठ मंडळात जिल्हा कार्याध्यक्ष इम्राण कुरेशी , चिमूर तालुका अध्यक्ष माधुरी विर , इंदिरा आत्राम, वरोरा तालुका उपाध्यक्षा पुष्पा ठावरी , भद्रावती तालुका अध्यक्ष लता देवगडे , साधना बंडावार , मुल तालुका अध्यक्ष सिंधु मद्दावार, सचिव वैशाली कोपुलवार , सिंदेवाही तालुका अध्यक्ष योगीता गेडाम, कमल बारसागडे, , नागभीड तालुका अध्यक्ष प्रभा चामटकर , , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या . सदर आंदोलनात चिमूर , वरोरा , भद्रावती , सिंदेवाही ,नागभिड तथा ब्रम्हपूरी येथील अंगणवाडी कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या .






