Chandwad

चांदवड नगरपरिषद तर्फे पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यास सुरुवात…

चांदवड नगरपरिषद तर्फे पावसाळ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यास सुरुवात…

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरातील पाण्याच्या पाईपलाईन चे काम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते.याबाबत वारंवार सोशल मीडियावर सुद्धा तक्रारी होत्या. तर काही निवेदने प्राप्त होती.आजपासून चांदवड नगरपरिषदने शहरातील पाईपलाईन मुळे व इतर खड्डे बुजविण्यास सुरुवात केलेली आहे.आज शहरातील सोमवार पेठ,जैन मंदिर रोड, जुन्या प्रांत कार्यालयमागील परिसर,शिंपी गल्ली,राम मंदिर रोड या भागात खड्डे बुजविले असल्याचे नगरपरिषद अभियंता श्री शेषराव चौधरी यांनी सांगितले.अजूनही काही रहिवासी भागात खड्डे पडलेले असतील तर त्या राहिवास्यांनी पाऊस सुरू होणेंअगोदर नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री अभिजित कदम व नगरपरिषद अभियंता श्री शेषराव चौधरी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button