बागल विद्यालयाच्या शिक्षक संघाचे वटवृक्ष मंदिरास दर्शन भेट
कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट
– करमाळा तालुक्याच्या कुंभेज येथील स्व.दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक हनुमंतराव पाटील, पर्यावरण शिक्षक कल्याणराव साळुंके, सीताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव, बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे आदींनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. तसेच मंदिर समितीचे विश्वस्त व करमाळा पंचायत समितीचे मा.उपसभापती संपतराव (भारत) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महेश इंगळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी स्व.दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय ही एक ग्रामीण भागातील प्रगत माध्यमिक शाळा असून कुंभेज व परिसरातील ग्रामीण भागातील होतकरू परंतु मागासलेल्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक संजीवनी या विद्यालयाच्या रूपाने विद्यार्थ्यांना लाभले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरिता शाळेच्या वतीने फुलपाखरू उद्यान, जलसंवर्धन, पक्षी संवर्धन, पर्जन्यमापन, विद्यार्थी निर्मित रोपवाटिका, निर्माल्यापासून खत निर्मिती आदींसह शिक्षणासोबतच पर्यावरण व वनसंवर्धन उपक्रम राबवून पर्यावरणाबाबत प्रात्यक्षिक अभ्यासाची माहितीही विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेचे एस. एस. सी. बोर्डात शंभर टक्के निकालाची परंपरा आहे. यासोबतच हि शाळा पर्यावरण संवर्धनात सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर असून स्वामी कृपेने शाळेचे नावलौकिक उत्तरोत्तर वाढत राहील अशी सदिच्छा व्यक्त करून सर्वाना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, गिरीश पवार, संजय पवार, विपुल जाधव, महादेव तेली व स्व.दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.






