बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांच्याकडुन कामाचा सपाटा सुरूच
प्रभाग क्रमांक सहा मधील रस्त्याच्या कामाबद्दल दिल्या ठेकेदारानां सूचना
लवकरच आ परिचारक यांच्या हस्ते होणार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरातील विविध विकास कामासाठी नगरोत्थान आणि दलित वस्थी सुधारणा योजनेतून सात कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी पंढरपूर नगरपालिका बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी काम सुरु होण्यापूर्वी जागेची पाहणी सुरु केली आहे. वरील योजनेतून शहरातील रस्त्यावर खडीकरण, डांबरीकरण, फेव्हर ब्लॉक बसविने, हायमाँस्ट दिवे बसवविने, वाल कंपउंड वाढविणे आदी कामे होणार आहेत. यासाठी ज्याठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. त्याठिकाणी काम सुरु होण्यापूर्वी जागेची पाहणी करून संबंधित ठेकेदार यांना सूचना देण्यात आहेत.
बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी नुकतीच प्रभाग क्रमांक सहा येथील गंजेवार दुकान ते बोंबलेकरं बोळ या रस्त्याचे लवकर काम सुरु होणार असल्यामुळे या भागाची पाहणी केली. सदरचे काम 12 लाख, 47हजार 960 रुपये चे आहे. हे काम लवकर पूर्ण करून घ्यावे याबाबत संबंधित ठेकेदार यांना सूचना केल्या आहेत.
या भागाची पाहणी करण्यात आली यावेळी त्यांचेसमवेत माजी नागराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरूदास अभ्याकर,माजी नगरसेवक शैलेश बडवे, आणि नगरपरिषद कर्मचारी तसेच ठेकेदार उपस्थित होते.या रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याचे उदघाटन जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परीचारक यांच्या हस्ते नागराध्यक्षा साधना भोसले आणि या भागातील नगरसेवक सुजाता बडवे, शकुंतला नडगिरे, यांच्या उपस्तितीत यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांनी सांगितले आहे.






