चोपडा येथील औषध निर्माण शस्त्र विभागत सन 2019 -20 चा निकालात मुलींने बाजी मारली………
लतीश जैन
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी सन 2019 -20 अंतर्गत औषध निर्माण शास्त्र विभागा चा निकाल नुकताच जाहीर केलेला आहे. विद्यापीठांतर्गत आपल्या चोपडा शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय यांच्या 100 टक्के निकाल लागलेला आहे. निकालाचे वैशिष्ट्य असे की दरवर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा मुलीने अव्वल स्थान पटकावले आहे.
प्रथम वर्षात कु. सलोनी घनश्याम अग्रवाल या विद्यार्थिनीने 650 पैकी 550 गुण प्राप्त केलेले असून ति प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तसेच कु. खुशबू सुनील पाटील या विद्यार्थिनीने 650 पैकी 538 गुण प्राप्त केले असून ति दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. कु. पाटील निकिता कांतीलाल या विद्यार्थिनीने 650 पैकी 535 गुण प्राप्त केलेले असून तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. द्वितीय वर्षात सुद्धा मुलींनेच बाजी मारली आहे. कु. नलिनी दिनेश वाघ या विद्यार्थिनीने 700 पैकी 605 गुण प्राप्त केले असून द्वितीय वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.
तिच्यापाठोपाठ कु. दिव्या दिलीप पाटील या विद्यार्थीनीने 566 गुण प्राप्त केलेले असून की द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. कु. मनुजा सतीश झाडे ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तसेच तृतीय वर्षात कुमारी याज्ञिकी किरण नेहाती हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच तृतीय वर्षात कुमारी अश्विनी अनिल पाटील व कुमारी अश्विनी दिलीप पाटील या विद्यार्थ्यांने द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ स्मिता संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम प्रकाश वडनेरे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.






