Maharashtra

दिलासादायक जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 61 टक्क्यांवर

दिलासादायक…जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 61 टक्क्यांवर

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित 6393 रुग्णांपैकी आतापर्यंत 3887 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

जळगाव : जिल्ह्यात आढळून आलेल्या 6393 कोरोना बाधित रुग्णांपैकी आज दिवसभरात (14 जुलै रोजी) 147 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 3887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 60.80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर हा 5.36 टक्यांपर्यत खाली आणण्यास प्रशासनास यश आले आहे. कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालीकेपासून 92 वर्षीय आजीच्या तर समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रूग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे.
जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत असून त्यांना आयएमए चेही सहकार्य मिळत आहे. शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रूग्णांना वेळेवर उपचार औषधी मिळत असल्याने व नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
रूग्णालय, कोविड सेंटर आणि अलगीकरण कक्षामध्ये रूग्णांना चहा, नाश्ता, जेवण आदि आवश्यक त्या सोईसुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळावे, याकरीता प्रशासनाने बेडचे नियोजन केले असून जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये सद्य:परिस्थितीमध्ये 833 बेड तर अलगीकरण कक्षात 655 बेड उपलब्ध आहे.

तालुकानिहाय कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या
जळगाव शहर- 831, जळगाव ग्रामीण- 121, भुसावळ- 402, अमळनेर- 356, चोपडा-284, पाचोरा-89, भडगाव- 262, धरणगाव- 159, यावल -278, एरंडोल- 194, जामनेर-118, रावेर-250, पारोळा- 267, चाळीसगाव- 73, मुकताईनगर -83, बोदवड -112, इतर जिल्ह्यातील- 8 याप्रमाणे एकूण 3887 रूग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या 2163 ॲक्टीव्ह रुगण
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 2163 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 1549, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 127, तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मध्ये 487 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये जळगाव शहर 676, जळगाव ग्रामीण 158, भुसावळ 127, अमळनेर 102, चोपडा 122, पाचोरा 38, भडगाव 10, धरणगाव 106, यावल 25, एरंडोल 104, जामनेर 225, रावेर 159, पारोळा 59, चाळीसगाव 71, मुक्ताईनगर 98, बोदवड 72, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 11 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6393 इतकी झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button