Maharashtra

पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी इ किटचे वाटप

पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी इ किटचे वाटप

कृष्णा यादव, प्रतिनिधी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूरातील उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना पी पी इ किट वाटप करण्यात आले. सदर मंदिर समितीच्या वतीने ५०० कीटचे वाटप करण्यात आल्यामुळे शहर व तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्या व नगराध्यक्षा साधनाताई भोसले, शकुंतला नडगिरे, मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रदीप केचे, लेखाधिकारी सुरेश कदम व रुग्णालयातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button