स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भारताला नवा आयाम मिळवून दिला – प्रा डॉ पी आर चौधरी
सलीम पिंजारी
प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी भारतीय राजकारणात महिला सक्षमीकरणाचा आदर्श घालून दिला. त्या अत्यंत करारी आणि धाडसी महिला पंतप्रधान असून त्यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय भारताच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारा ठरला. स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या महिला सशक्तिकरणाच्या आदर्शवत आहेत असे गौरवोद्गार तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीच्या वतीने आयोजित स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंती प्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य उदय जगताप, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, उपप्राचार्य प्रा डॉ ए आय भंगाळे, उपप्राचार्य प्रा ए जी सरोदे तसेच राष्ट्रीय सण आणि उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ आय पी ठाकूर इतर सन्मा प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ आय पी ठाकूर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा जीवन परिचय उपस्थितांना करून दिला. यासोबत भारतीय राजकारणात इंदिरा गांधींचे अढळस्थान विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ डी एल सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सपकाळे,शेखर महाजन, चेतन इंगळे, सिद्धार्थ तायडे, जी एन देवकर आदींनी परिश्रम घेतले.





