Paranda

१४वा वित्त आयोगाची कामे न करता निधी उचलून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा वडणेर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर ठपका

१४वा वित्त आयोगाची कामे न करता निधी उचलून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा वडणेर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर ठपका

ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा( सा.वा ) दि. २६

१४वा वित्त आयोगाची कामे न करता निधी उचलून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा वडणेर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर ठपका.
तर तत्कालीन सरपंचाचे स्वहिस्सा मानधन देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ .

परंडा तालुक्यातील मौजे वडणेर / सरणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री . ओ . एम बिराजदार यांनी १४ वा वित्त आयोग निधीची कामे न करताच निधी उचलून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे
१४ व्या वित्त आयोग या खात्यातून धनादेश रुद्रा सोलर मल्टीसव्हीसेस बीड यांच्या नावे दि . o९ / ०९ / २०१९ रोजी पाच धनादेशाव्दारे एकूण ७o, ८००० रुपायांची रक्कम काम न करता उचलून अपहार केल्याचे सिध्द झाले होते . याबाबत ग्रामसेवक श्री . ओ . एम बिराजदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पंचायत समिती स्तरावरून खुलासा मागवण्यात आला होता . त्याबाबत रक्कम स्पये ७०, ८००० हि दि . १६ / ११ / २०१९ ते १८ / ११ / २०१९ या कालावधीत रक्कम वसुल करण्यात आली आहे . वास्तवीक पाहता ग्रामपंचायतीचे धनादेश व अनुषंगिक अभिलेख ग्रामपंचायतीमध्ये सुरक्षित ठेवणे हि जबाबदारी ग्रामसेवक या नात्याने श्री . ओ . एम . बिराजदार यांची असताना त्यांनी ते पार पाडले नसल्याचे दिसून आले आहे . ही बाब अतिशय गंभीर असून त्यांनी गौर शिस्तीचे वर्तन केल्याचे स्पष्ट होते .
तर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच श्रीमती नसरीन सलीम शेख या अल्पसंख्याक समाज्याच्या असून यांचे ग्रामपंचायतीचे स्वहिस्सा २५ टक्के मानधन त्यांना अदा करणे हे ग्रामसेवकाचे कर्तव्य असताना त्यांनी ते पार पाडले नसल्याचे दिसून येते व यावरून त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट होते त्यामुळे त्यांनी गैर शिस्तीचे वर्तन केल्याचेही स्पष्ट होते .
तसेच ग्रामस्तरावर ग्रामसभा घेण्याच्या सूचना देऊन मासिक ग्रामसभा न घेताच कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटी माहिती दिली व तत्कालीन सरपंच काही ग्रामपंचायत सद्स्य यांना बैठकीचे निमत्रण पत्र न देणे बैठक बोलावूनही स्वता : हजर न राहणे कार्यालय ग्रामसभेच्या दिवशीच बंद ठेवून ग्रामसभेस दांडी मारणे असे प्रकार ग्रामसेवक बिराजदार यांच्याकडून घडल्याचे सिद्ध झाले असल्यामुळे त्यांच्यावर गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button