Kolhapur

दौलतराव निकम विद्यालयाचे १३ विद्यार्थी राज्यपाल पुरस्कार प्राप्त.

दौलतराव निकम विद्यालयाचे १३ विद्यार्थी राज्यपाल पुरस्कार प्राप्त.
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयाने कोविड १९ चा प्रादुर्भाव असताना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आवश्यक प्रात्यक्षिक करवून घेतले होते.
या पुरस्कारासाठी ६ स्काऊट व ७ गाईड प्रविष्ठ झाले होते.या सर्वच विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.यामध्ये स्काऊट विभागातून गणेश चव्हाण,संदेश करपे, आदित्य खणे,ओंकार खणे, केदार मोरे व सौरभ तेली तर गाईड विभागातून मनस्वी चौगुले,वैष्णवी कुलकर्णी,धनश्री शेळके,प्राजक्ता गुरव,मनाली वठारे,साक्षी बाड व आरती जाधव हे विद्यार्थी पात्र झाले आहेत.
या विद्यार्थांना संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांची प्रेरणा मिळाली.स्काऊट प्रमुख एस.बी.पाटील व गाईड गाईड प्रमुख एम.जे.खोत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button