Pandharpur

राष्ट्रवादी ला घरचा आहेर राज्यमंत्री भरणेंनी पक्षाकडे धनगर समाजाला उमेदवारीसाठी आग्रह धरावा! डॉ अर्चना पाटील

राष्ट्रवादी ला घरचा आहेर राज्यमंत्री भरणेंनी पक्षाकडे धनगर समाजाला उमेदवारीसाठी आग्रह धरावा! डॉ अर्चना पाटील

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे धनगर समाजासाठी उमेदवारी बाबत आग्रह धरावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पंढरपूर विधानसभेची जबाबदारी आहे. या मतदार संघामध्ये धनगर – ओबीसी समाजाची ताकत मोठी आहे त्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळणे अपेक्षित आहे. या अगोदरच धनगर समाजाच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे.पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकवेळी त्याच त्याच लोकांना आलटून पालटून उमेदवारी दिली जाते त्यामुळे त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष मात्र धनगर समाजा ला कायम दुय्यम वागणूक मिळत आहे त्यामुळे धनगर समाजातील तरुण आता विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला तिकीट मिळावे यासाठी आग्रही आहेत. जर तिकीट नाही दिले तर प्रस्थांपिता विरोधात बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाला गृहीत धरले जाते फक्त मतांपुरता वापर केला जातो त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे असे यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी म्हटले आहे. अन्य था धनगर समाजाला या निवडणुकीमध्ये गृहीत धरू नका. महाराष्ट्र राज्याचा नुकताच अर्थसंकलपामध्ये धनगर समाजाला भरीव निधी न दिल्यामुळे समाजामध्ये पक्षाविषयी नाराजी आहे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या २२ योजना बद्घल सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्यक होते. पण तसे होताना दिसत नाही. असे यावेळी डॉ अर्चना पाटील यावेळी म्हणाल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button