Parola

राजवडच्या पटेल दाम्पत्याचा विशेष पुरस्काराने सन्मान.

राजवडच्या पटेल दाम्पत्याचा विशेष पुरस्काराने सन्मान.

देविदास चौधरी पारोळा

पारोळा : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जळगाव यांच्या वतीने राजवड येथील डॉ.उस्मान पटेल सामाजिक कार्यकर्ते, उपक्रमशील शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकिजा पटेल यांना सावदा येथे रावेरचे आमदार माननीय शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. पटेल यांना युरोप देशाकडून डॉक्टरेट तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे 47 पुरस्कार व देशभरातून कोरोना योद्धा सन्मान मिळाला असल्याने त्याच प्रमाणे डॉ.पाकिजा पटेल यांना 92 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार व युरोप देशाकडून डॉक्टरेट मिळाल्याने त्यांना विशेष पुरस्कार बहाल करण्यात आला. पटेल दांपत्याच्या शैक्षणिक कार्याच्या चढता आलेख बघता भविष्यात उत्तुंग शिखरावर पोहोचतील. त्यांच्या कार्याची शृंखला सदैव इतरांना प्रेरणादायी ठरेल असे गौरवोद्गार माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांनी काढले. या पुरस्कारामुळे सर्व क्षेत्रातून पटेल दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button