लामजना जिल्हा प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लातुर औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
लामजना – औसा तालुक्यातील लामजना जिल्हा परिषद प्रशाला शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आर जी पाटू सर यांच्या हस्ते महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य मंगल कांबळे, सरपंच जाहेदाबी पटेल, उपसरपंच वाजीद बिरादार,माजी सरपंच रामप्रसाद बजाज, ग्राम पंचायत सर्व सदस्य यांची उपस्थिती होती.
तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयकुमार दंडगोले, उपाध्यक्ष हुमेरा शेख, सदस्य संजय आबा शिंदे, रविंद्र शेळके, मन्मथ स्वामी, दगडू बिराजदार व सर्व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षकवृंद, गावातील नागरिक, आजी माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत, सांस्कृतिक नृत्य, नाट्य सादर केले.






