Baramati

डोरलेवाडीत जनता कर्फ्युचे तीनतेरा

डोरलेवाडीत जनता कर्फ्युचे तीनतेरा

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनता कर्फ्यु लागू केला आहे.मात्र,डोरलेवाडी(ता.बारामती) येथे नागरिक मोकटपणे विनामास्क फिरत आहेत.किराणा फळभाजी विक्रेते व इतर व्यावसायिक दुकाने उघडून माल देत आहेत.नागरिकांवर स्थानिक प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही.त्यामुळे जनता कर्फ्युचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
बारामती शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णाचा वाढत्या संख्येची प्रशासनाने गंभीर घेत सोमवारपासून जनता कर्फ्यु लागू केला आहे.बारामती शहरात त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे.विनामास्क व नियमांचे पालन न करणाऱ्या शेकडो नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र त्या तुलनेत ग्रामीण भागातील चित्र पुर्णपणे वेगळे आहे.डोरलेवाडी येथे जनता कर्फ्यु असूनही नागरिक मोकटपणे विनामास्क रस्त्यावर आढळून येत आहेत.चौकाचौकात गर्दी करून बसत आहेत.
दुकानदार मालाची विक्री करीत आहेत.ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष, कोतवाल हे घरी जाऊन सूचना करूनही व्यावसायिक त्यास जुमानत नाहीत.त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र,गावात या आठवड्यात तब्बल 19रुग्ण सापडले,त्यामुळे गावात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button