Faijpur

फैजपूर पोलीसाची गावठी दारु, जुगार हद्दपारी साठी धडाकेबाज कार्यवाही तब्बल सहा ठिकाणी छापेमारी..१७ आरोपी अटकेत

फैजपूर पोलीसाची गावठी दारु, जुगार हद्दपारी साठी धडाकेबाज कार्यवाही तब्बल सहा ठिकाणी छापेमारी..१७ आरोपी अटकेत

फैजपूर सलीम पिंजारी

पाडळसे ता- यावल वार्ताहर फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये तीन दिवसापासून गावठी दारु व अवैध धंदाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी फैजपूर पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यामध्ये पाडळसे , भोरटेक , कासवे , न्हावी या गावांमध्ये छापेमारी करून फैजपूर पोलिसांनी तब्बल सतरा आरोपींना अटक केली असून सर्वांवर गुन्हे दाखल केलेला आहे पाडळसे येथील रवींद्र कोळी हा गावठी हातदारुची भट्टी लावून मिळून आला त्याच्या कडून 18500/ रुपये किंमतीचे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू पाडण्याचे गुळ, मोह, मिश्रित कच्चे रसायन दारू असा मुद्देमाल मिळून आला पाडळसे येथील च अशोक कोळी हा गावठी हातभट्टीचे १०५००/ रुपये किंमतीचे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू पाडण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला कासवे ता. यावल येथील जगन तायडे याच्या ताब्यातील गावठी हातभट्टीची दारू गुळ,मोह, मिश्रित रसायन असा 16500/ चा मुद्देमाल मिळून आला.

सोपान सपकाळे रा. कासवा हा गावठी हातभट्टीची दारू, गुळ,मोह कच्चे-पक्के रसायन व दारु असा नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच न्हावी /पाडळसे येथील जुगार खेळताना न्हावी येथील लोकेश वारके , गिरीश लढे, हितेश चोपडे ,अजित चोपडे, उल्हास चोपडे ,प्रितेश लढे, प्रवीण इंगळे, चेतन झोपे, व पाडळसे येथील हिरानंद भोई,संजय बाविस्कर, सोपान कोळी, संजय भोई,सैय्यद इमरान यांना झना मन्ना खेळताना अटक करुन सर्वावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कार्यवाही फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी नरेद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखडे, पोलीस उपनिरिक्षक रोंहीदास ठोंबरे, सहाय्यक फौजदार हेंमत सांगळे, पो.काँ.उमेश पाटील, पोलीस हवालदार रोहीदास सुरदास,पोलीस नाईक किरण चाटे, महेश वंजारी,अनिल महाजन उमेश सानप ,चेतन महाजन यांनी ही कार्यवाही पार पाडली पुढे देखील अशीच कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस विभागाकडून कळविण्यात येते ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात कार्यवाही केल्याने पोलीस विभागाचे कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button